Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rain : पुढचे दोन दिवस मुसळधार! कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्याच्या परिसरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून त्याचा परिणाम पुणे शहर, घाटमाथ्याचा परिसर आदी भागांत दिसून येत आहे. हा जोर पुढील काही तासांसाठी कायम असणार आहे. शहरात तरी संततधार सुरू आहे.

Pune Rain : पुढचे दोन दिवस मुसळधार! कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्याच्या परिसरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस (बारामती)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:30 PM

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार (Heavy rain) पावसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्यात सध्या विविध जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 9 आणि 10 ऑगस्टसाठी हा अंदाज आहे. म्हणजेच आज आणि उद्या हे दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्याला हवामान विभागाने रेड अलर्ट (Red alert) घोषित केला आहे. दरम्यान, कालपासून (सोमवार) पुणे शहर आणि परिसरात सुरू झालेली पावसाची संततधार अजून कायम आहे. आतापर्यंत 13.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज (मंगळवार) दिवसभर शहरात 40 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून सक्रिय

राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून त्याचा परिणाम पुणे शहर, घाटमाथ्याचा परिसर आदी भागांत दिसून येत आहे. हा जोर पुढील काही तासांसाठी कायम असणार आहे. शहरात तरी संततधार सुरू आहे. मात्र घाट माथ्यावर याचा जोर अधिक दिसून येत आहे. तर पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार आहे. पुढील काही तासांत शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. प्रति तास 3 ते 4 मिलिमीटर अशी ही सरासरी असण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी होताना दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

रेड अलर्ट आणि राज्यात नुकसान

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडताना दिसून येत आहेत. अमरावती जिल्ह्यात तर काल झालेल्या पावसामुळे एकाच दिवसात सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तीन मजूर तर वरूड तालुक्यात दोन जण आणि तिवसाच्या शिवनगावात एक वृद्ध पुरात वाहून गेला आहे. तर वाशिममध्ये वृद्ध दाम्पत्याचे घर कोसळले आहे.

राहत्या घराची भिंत कोसळली

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे नारायण टाव्हरे या शेतकऱ्याची राहत्या घराची भिंत कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विनाविजेचे बोअरवेलमधून पाणी येतानाही दिसून येत आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.