पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार (Heavy rain) पावसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्यात सध्या विविध जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 9 आणि 10 ऑगस्टसाठी हा अंदाज आहे. म्हणजेच आज आणि उद्या हे दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्याला हवामान विभागाने रेड अलर्ट (Red alert) घोषित केला आहे. दरम्यान, कालपासून (सोमवार) पुणे शहर आणि परिसरात सुरू झालेली पावसाची संततधार अजून कायम आहे. आतापर्यंत 13.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज (मंगळवार) दिवसभर शहरात 40 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून त्याचा परिणाम पुणे शहर, घाटमाथ्याचा परिसर आदी भागांत दिसून येत आहे. हा जोर पुढील काही तासांसाठी कायम असणार आहे. शहरात तरी संततधार सुरू आहे. मात्र घाट माथ्यावर याचा जोर अधिक दिसून येत आहे. तर पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार आहे. पुढील काही तासांत शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. प्रति तास 3 ते 4 मिलिमीटर अशी ही सरासरी असण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी होताना दिसून येत आहे.
9,10 ऑगस्ट,IMD GFS मॉडेल मार्गदर्शन: कोकण,मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह, अतिवृष्टीची शक्यता.
IMD GFS Model guidance for 9,10 Aug: Possibility of hvy to very hvy rains with extremely hvy at isol places in Konkan,Ghat areas of Madhya Mah during period pic.twitter.com/qpi2YaSv92— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 9, 2022
जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडताना दिसून येत आहेत. अमरावती जिल्ह्यात तर काल झालेल्या पावसामुळे एकाच दिवसात सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तीन मजूर तर वरूड तालुक्यात दोन जण आणि तिवसाच्या शिवनगावात एक वृद्ध पुरात वाहून गेला आहे. तर वाशिममध्ये वृद्ध दाम्पत्याचे घर कोसळले आहे.
Well marked LPA ovr nw BoB & adj area of coastal Odisha,N coastal AP & wc BoB mved slowly w-nw turned in depression today mrng ovr coastal Odisha & nhbd,abt 70km,n-nw of Bhubaneswar
Likely to move w-nw maintain its intensity today &weaken slowly in WML over C’garh & nbhd 10th pic.twitter.com/dRJOC51xaK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 9, 2022
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे नारायण टाव्हरे या शेतकऱ्याची राहत्या घराची भिंत कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विनाविजेचे बोअरवेलमधून पाणी येतानाही दिसून येत आहे.