Pune rain : ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटासह रविवारी पुण्यात पाऊस? हवामान खात्याचा अंदाज

जुलैचा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. सांगली (-36 टक्के) अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्य किंवा जास्त पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या पावसाळ्यात 669 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा 31 टक्के जास्त आहे.

Pune rain : ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटासह रविवारी पुण्यात पाऊस? हवामान खात्याचा अंदाज
दोन दिवसांपूर्वी पुणे परिसरात झालेला पाऊसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 7:35 PM

पुणे : पुणे शहरासह आसपासच्या भागात रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार (Heavy rain) असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र हा पाऊस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार असण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD pune) वर्तवण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, पुणे शहरात दोन दिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झालेली पाहायला मिळाली होती. शुक्रवारीही शहरात दुपारी 4 ते 5.30 या वेळेत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शिवाजीनगरमध्ये (Shivaji Nagar) दिवसभरात तासाभरात 8 मिमी पावसाची नोंद झाली. दोनच दिवसांपूर्वी शहरात तासाभरात 50 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. आता रविवारी पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मागील जोरदार पावसामुळे काही धरणे फुल होत आहेत, त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता सध्यातरी मिटली आहे.

मान्सूनचा वेग कमी

मान्सूनचा प्रवाह कमकुवत असल्याने संवहनी क्रिया सध्या प्रबळ आहेत. दिवसाच्या तापमानात होणारी वाढ आणि ओलाव्याची स्थिती यामुळे अशा संवहनी क्रिया होत आहेत. त्यामुळेच पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे शहरात जुलै महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा 4 ते 5 अंशांनी अधिक राहिले आहे. हे मुख्यत: सौर किरणोत्सर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी ढग किंवा हवामान प्रणाली नसल्यामुळे आहे. असाच हवामानाचा अंदाज पुढील एक आठवडा महाराष्ट्रासाठी वर्तवण्यात आला आहे. कारण मान्सूनचा वेग कमी राहणार आहे. 4 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राला प्रभावित करणारी कोणतीही मोठी पर्जन्यमान प्रणाली नाही, असे आयएमडी अधिकाऱ्याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

जुलैचा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. सांगली (-36 टक्के) अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्य किंवा जास्त पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या पावसाळ्यात 669 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा 31 टक्के जास्त आहे. 4 ऑगस्टनंतर, अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि आर्द्रतेचा जोर वाढल्याने राज्यातील पावसाच्या हालचाली हळूहळू सुधारतील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.