Pune rain : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पुढचे तीन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

पूर्व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकले आहे. या परिसरात जोरदार पाऊस पडणार आहे.

Pune rain : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पुढचे तीन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा
राज्यातील पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:30 AM

पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार (Heavy rain) पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने (India Meteorological Department) हा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतात. तर मागच्या दोन दिवसांपासून उघडीप घेणारा पाऊस आता पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला असून शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकले

पूर्व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकले आहे. या परिसरात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस कमी होण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मॉन्सूनचा आस पुढील आठवड्याच्या शेवटी मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस कमी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार

पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी, घोटी, इगतपुरी या परिसरात जोरदार पाऊस कायम राहणार आहे. साधारणपणे तीन दिवसांनंतर म्हणजेच मंगळवारनंतर (ता.23) पावसाचे प्रमाण कमी होईल. काही ठिकाणी तुरळक आणि हलका पाऊस बरसत राहणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.