Chandrakant Patil | मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्या अन्यथा तीव्र निदर्शने करू, समझने वालों को इशारा काफी है; चंद्रकांतदादांचा सूचक इशारा

मी काही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फूट पाडत नाही. पण ते हुशार नेते आहे. राठोडांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केलं तर राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची चौकशी सुरू होताच राजीनामा दिला. मग मलिकांची का नाही. शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीचा का होत नाही याचा सेनेने विचार करावा.

Chandrakant Patil | मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्या अन्यथा तीव्र निदर्शने करू, समझने वालों को इशारा काफी है; चंद्रकांतदादांचा सूचक इशारा
chandrakant Patil
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:32 PM

पुणे – महाविकास आघाडी सरकारामधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांना ईडीने (ED)अटक केली आहे.   ईडीने अटक केली तरी ते राजीनामा देणार नाही म्हणतात आघाडीचे नेते. याचा अर्थ 93 च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या गुन्हेगारांना हे समर्थन करत आहेत. हे पाठबळ देत आहेत. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते. त्यांना पाठबळ देणारे नवाब मलिक हे कसे बरोबर होते.  हे सांगण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि भाजप हा प्रयत्न हाणून पाडेल. सुरुवातीला ‘ समजनेावाले को इशारा काफी ‘ अशा पद्धतीने आम्ही निदर्शने केली. आता या विषयावर तीव्र निदर्शने केली जाणार आहेत. एखादा सरकारी कर्मचारी अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला सस्पेंड केली जाते. आणि चार्जशीट सबमिट झाल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकायचं असतं. जरी आम्हाला हा कायदा लागू होत नसला तरी एका मिनिस्टरने हे संकेत पाळायला नको का? त्यांच्या नेत्यांनी हे सांगायला नको का? अशी टीका भाजप आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil)यांनी केली आहे.

शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली

मी काही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फूट पाडत नाही. पण ते हुशार नेते आहे. राठोडांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केलं तर राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची चौकशी सुरू होताच राजीनामा दिला. मग मलिकांची का नाही. शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीचा का होत नाही याचा सेनेने विचार करावा. 93मध्ये बाळासाहेबांनी काय भाषणं केली ती आम्ही ऐकवणार आहोत. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली. आता ही भूमिका शिवसेना घेणार का हा प्रश्न आहे.

सेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही

महाविकास आघाडीत असेपर्यंत सेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. किमान समान कार्यक्रमात एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत हे त्यांनी ठरवलं आहे. शिवसेना त्या सत्तेत आहेत. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील. 6 मार्च रोजी मोदी मेट्रोचं लोकार्पणाला येणार आहे. त्या स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकर रेल्वे स्टेशन नाव देण्याची विनंती केली आहे. त्याच दिवशी घोषणा झाली तरी बरं होईल. मी मोदींना मेल करणार आहे. या देशातील लोकशाहीची ब्युटी अशी आहे की न कळणाऱ्या मुलांना त्याला जे काही करायचं ते करायचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिकार आहे. लहान मुलांना काही म्हणायचा अधिकार आहे. हे तर मुख्यमंत्री आहेत. ते काहीही म्हणू शकतात. देवेंद्र फडणवीस आणि मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले

उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा… पोटाच्या समस्यांपासून दूर रहा

क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी; जाणून घ्या प्रमुख क्रिप्टो करन्सीचे आजचे भाव

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.