…तर आपला देश वेगळ्या वळणावर असता, इम्तियाज जलील यांनी सांगितली ती आठवण
दंगलीमध्ये मोठी माणसं कोणी मरत नाही तर नुकसान गरिबांचे होते. दंगली कुणी सामान्य माणूस करत नाही. तर, राजकीय पक्ष दंगली घडवून आणतात.
अभिजित पोटे, प्रतिनिधी, पुणे : खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ज्या पत्रकार संघात मी पत्रकार म्हणून बसत होतो त्याचं संघात आज मी खासदार म्हणून आलोय. मी स्वताला भाग्यवान समजतो. मी सत्कार व्हावा म्हणून दंगल रोखण्याचे काम केलं नव्हतं. लोक प्रतिनिधी म्हणून हे काम केलं होत. २०१४ मध्ये आमदार असतानाही मला कळलं होत की ३० वर्षात माझ शहर मागे पडलं आहे. त्यांचं कारण फक्त जातीय दंगली आहेत. २०१८ मध्ये मी सिंगापूरला गेलो होतो. त्यावेळी देखील रात्री २ वाजता मला कळलं की औरंगाबादमध्ये पुन्हा काहीतरी गडबड झाली आहे. त्यावेळी शहरात दंगल झाली होती.
दंगलीमध्ये मोठी माणसं कोणी मरत नाही तर नुकसान गरिबांचे होते. दंगली कुणी सामान्य माणूस करत नाही. तर, राजकीय पक्ष दंगली घडवून आणतात. दंगली कधी सुरू करायच्या आणि कधी संपवायचं हेदेखील तेच ठरवतात, असा आरोप इम्पियाज जलील यांनी केला.
९ एप्रिल औरंगाबादमध्ये तेच झालं. त्या दिवशी मी रात्रभर पोलीस अधिकाऱ्यांना फोन करत होतो. अनेक पोलिसांना त्याबद्दल माहितीदेखील नव्हतं. मला दरवेळी अर्धवट माहिती देण्यात आली. पोलिसांनी मला खोटी माहिती दिली. मला देखील घटनास्थळी जाऊ दिलं नाही.
पोलीस आराम करत होते
शहर जळताना अनेक पोलीस अधिकारी घरी आराम करत होते. मला त्यावेळीदेखील शंका आली होती की हा दंगा जाणून बुजून घडवून आणला जात आहे. दुसऱ्या दिवशी रामनवमी होती. ती बातमी जर बाहेर आली असती की राम नवमीच्या आधी औरंगाबादमध्ये राम मंदिरात असं काही झालं आहे तर आपला देश जळला असता, वेगळ्या वळणावर असता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
घटनास्थळी फक्त १५ पोलीस होते. एवढं होऊनदेखील पुरेशी सुरक्षा देण्यात आली नव्हती. हे आश्चर्यकारक होते. मला मंदिराला काही होऊ द्याच नव्हतं. मंदिरातील स्टाफदेखील लॉक करुन आत बसले होते. मी आजही सांगतो मंदिरात काही झालं नव्हतं. सगळं मंदिराच्या बाहेर झालं होतं. हा कट जाणून बुजून रचला गेला होता.
पाच टक्के लोकं दंगली भडकवतात
पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्हीदेखील ताब्यात घेतले होते. जलील यांनी वाचून दाखवलं पंतप्रधान मोदींचं ते पत्र. पत्रावरून इम्तियाज जलील यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देशातले ५ टक्के लुच्छे लोकं देशात दंगली भडकवतात. त्यांना देशाची शांतता नको आहे, असा आरोपही इम्तीयाज जलील यांनी केला.