Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या

बासाहेब काटे यांचेसह सुमारे 20  जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र या चौकशीला कंटाळून काटे यांनी आत्महत्या केली.

pimpri chinchawad crime | पिंपरीत सतत पोलीस चौकशीला कंटाळून मजुराने केली आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 5:59 PM

पिंपरी – शहरातील सांडस येथे काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45,हवेली ) या व्यक्तीचा हत्या( murder )  झाल्याची घटना घडली होती. हत्या झालेली व्यक्ती मासेमारीचा व्यवसाय करत होती. या घटनेनंतर पोलिसांनी बाबासाहेब बबन काटे (वय-32, रा. भवरापूर, ता. हवेली) या व्यक्तीची पोलिसांनी गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी चौकशी केली. पोलिसांनी सलग तीन दिवस झालेलया चौकशी मुळे नैराश्यात गेलेल्या बाबासाहेब काटे याने विष(poisonपिऊन आत्महत्या (Suicide)केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून झालेल्या चौकशीमुळे खुनाचा आरोप आपल्यावर येईल अशी भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं

काही दिवसांपूर्वी संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड हे बहिणीकडे जातो असे सांगून घराच्या बाहेर पडले. त्यानंतर चार दिवसांनी त्याचे त्यांचा मृतदेह शरीराचे धड व हात – पाय छाटलेल्याअवस्थेत अर्धवट मृतदेह मिळून आला होता.त्यानंतर आणखी दोन दिवसांनी उरलेला मृतदेह आढळून आला. या हत्येच्या घटनेने स परिसरात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर याप्रकरणी बाबासाहेब काटे यांचेसह सुमारे 20  जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह क्राईम ब्रँच युनिट 6 च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र या चौकशीला कंटाळून काटे यांनी आत्महत्या केली. काटेने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या चौकशीत बरे वाईट होईल या भीतीने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे.

पोलिस चौकशी जावे लागत असल्याने माझ्या कामाच्या ठिकाणी खाडे होत आहेत. माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका. मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा मला झोपही लागली नाही. मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन आल्यामुळे मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.

चक्क सरकारच्या नावाने लॉटरीचं आमिष, “सजग राहा”, सरकारकडून सावधानतेचा इशारा

IND VS WI: ‘अरे निघालात कुठे थांबा’, विराट-रोहित अंडर 19 टीमसमोर फेल

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका.
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी.
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला - अजित पवार
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला - अजित पवार.
अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले
अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले.