पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार, अजित पवार यांची घोषणा
पूर्णवेळ शाळांचा हा निर्णय फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड पूरता मर्यादित असल्याचेही त्यांनी संगितले आहे.
पुणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णसंख्या बघून शाळांबाबतच निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून शहरातील 1ली ते 8 वीपर्यंतच्या शाळा हाफ डे पद्धतीने सुरु केल्या होत्या. मात्र आता हाफ डे बंद करून पूर्णवेळ शाळा सुरू करणार, हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.