Pune Crime | पुण्यात भामाआसखेड धरणात पोहण्यासाठी उतरले अन… , डोळ्यात देखत बुडाले ; मामे बहिणीसह भावाचा बुडून दुदैवी मृत्यू

बिरदवडी येथील कुटुंबीय व नातेवाईक एकत्रितपणे शिवे गावच्या हद्दीतील भामा आसखेड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यातील चारजण पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघे व्यवस्थित बाहेर आले. मात्र, रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि चाकण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Pune Crime | पुण्यात भामाआसखेड धरणात पोहण्यासाठी उतरले अन... , डोळ्यात देखत बुडाले ; मामे बहिणीसह भावाचा बुडून दुदैवी मृत्यू
डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:58 AM

पुणे – खेड तालुक्यातील शिवे येथे भामाआसखेड धरणात(Bhamaaskhed dam) पोहण्यासाठी गेलेल्या मामे बहिणीसह भावाचा बुडून मृत्यू (Death ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहन संजय रोकडे (वय 24) व प्राजक्ता देविदास पवार (वय 20, रा. बिरदवडी, ता. खेड) अशी मृतांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर पोलीस, स्थानिक कार्यकर्ते यांना मृतदेह मिळवण्यात यश आले आहे. होळीची(Holi)  सुट्टी असल्याने चौघेजण भामाआसखेड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यावेळी इतर दोघे पोहून सहीसलामत पाण्याबाहेर आले. मात्र मृत प्राजक्ता व रोहन यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या दुदैवी घटने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरदवडी येथील कुटुंबीय व नातेवाईक एकत्रितपणे शिवे गावच्या हद्दीतील भामा आसखेड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्यातील चारजण पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघे व्यवस्थित बाहेर आले. मात्र, रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि चाकण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सुरुवातीला एक मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. चाकण पोलिस स्‍थानकात मृत्यूची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने बिरदवडी गावावर शोककळा पसरली आहे.

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ; इंधनाचे नवे दर जारी

Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!

IMD | चंद्रपुरात पारा भडकला, तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर, विदर्भात 48 तास उष्णतेच्या लाटेचे!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.