Pune crime | पुण्यात पैश्याच्या हव्यासापोटी चक्कआईच्या बनावट सह्या करून मुलाने केले ‘हे’ कृत्य
फिर्यादींनी लहान मुलासाठी अॅक्सेस बँकेच्या लॉकरमधून तब्बल 30 तोळे दागिने ठेवण्यात आले होते ठेवले होते. ते दागिने ही आईच्या खोट्या सह्याकारत देखील हादी आणि रमिजा यांनी काढून घेतले. मात्र यासगळ्या गोष्टींबाबत दोघांनाही एकदाही आईला कल्पना दिली नाही.
पुणे – पैश्याच्या हव्यासापोटी चक्क आईच्या बँकेत (Bank)असलेल्या ठेवी, लॉकरमधील दागिन्यांच्या चोरी साठी मुलाने आईच्या खोट्या सह्या करून रक्कम लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंढवा(Kondhav) परिसरात ही घटना घडली याप्रकरणी पोलिसांनी (Police)याप्रमाणे हादी किफायत खलपे (36) आणि रमिजा हमीद आंबेडकर (30) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित जबिन किफायत खलपे (62, रा. नताशा इन्क्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हादी खलपे याने आईच्या नावे असलेल्या बँकेतील ठेवी काढण्यासाठी बनावट सह्या केल्या आहेत.
अशी केली फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हादी हा फिर्यादी यांचा मुलगा असून त्याने 15 मे ते 17 नोव्हेंबर 2020 च्या कालावधीत फिर्यादीच्या खोट्या सह्या करून वानवडीतील अॅक्सेस बँकेतून 80 हजार काढले. तसेच फियार्दीच्या 2 लाख 75 हजारांच्या मुदत ठेवी खोट्या सह्या करून काढल्या. फिर्यादींनी लहान मुलासाठी अॅक्सेस बँकेच्या लॉकरमधून तब्बल 30 तोळे दागिने ठेवण्यात आले होते ठेवले होते. ते दागिने ही आईच्या खोट्या सह्याकारत देखील हादी आणि रमिजा यांनी काढून घेतले. मात्र यासगळ्या गोष्टींबाबत दोघांनाही एकदाही आईला कल्पना दिली नाही. याउलट फिर्यादी आई बँकेत गेल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र त्यांनी कोंढवा पोलीस स्थानकात धाव घेऊन मुलाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोक्काअंतर्गत एकावर कारवाई
पुण्यातील कोथरूड आणि वारजे परिसरात गायकवाड टोळी चालवणाऱ्या आणि मोक्का लावण्यात आलेल्या निलेश गायकवाड याला भोसरी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 पिस्तुल आणि 19 काडतुस जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर 9 गुन्हे दाखल असून 3 गुन्ह्यात तो फरार होता. भोसरी एम आय डी सी पोलिसांना निलेश गायकवाड हा मोशी भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार त्याला अटक करण्यात आलीय.
Nagpur Court | सहमतीने शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे, सत्र न्यायालयाचा निर्णय, आरोपी दोषमुक्त
नाशिकमध्ये आणखी एक कोरोना बळी; किती आहेत रुग्ण, काय आहे आजचा रिपोर्ट?
VIDEO: लोकांना न्याय द्या, ही शाखा आहे, दुकान नाही; राज ठाकरेंच्या मनसे सैनिकांना तंबी