Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पुण्यात तरुणांची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांवर ‘कोयत्याने’ वार

कोयत्याने लोणकर यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. या घटनेत प्रीतमच्या उजव्या हाताच्या करंगळीवर लागून ते जखमी झाले. या मुलांचीसुरु असलेली भांडणे पाहून कात्रज चौकात वाहतूक पोलिसांच्या ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई मनोज बदडे तेथे आले. त्यांनीही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रयत्न सुरु असतानाच आरोपी कैफ आरिफने त्याच्या हातावर कोयत्याने वार करत त्यांनाही जखमी केले.

Pune Crime | पुण्यात तरुणांची भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांवर 'कोयत्याने' वार
पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 1:06 PM

पुणे – शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली पोलिस प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. सातत्याने घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमुळे शहरात . कायदा व सुव्यवस्थेचा धाक उरलाय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कात्रज चौकात ( Katraj Chowk)किरकोळ वादावादीतून टोळक्याने तरुणावर हल्ला केला. या तरुणांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ड्युटीवरील वाहतूक पोलिसावरही (Traffic Police) या टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला (attack with a scythe)करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कात्रज चौक पोलिसांनी आरोपी कैफ आरिफ शेख (वय-18  संतोष नगर कात्रज) याला अटक केली आहे. या प्रकरणी प्रीतम माधव लोणकर (वय -30 ) यांनी कात्रज पोलिसात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावर काय झालं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितम लोणकर हा मित्रांबरोबर चहा पिण्यासाठी हॉटेल गणेश येथे गेला होता. तेथे गाडी पार्क करीत असताना एका मुलाने त्यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली. ही वादावादी सुरु असताना संबंधित मुलाने मी कोण आहे ते दाखवितो, असे म्हणून त्याने तेथे असलेल्या त्याच्या इतर साथीदारांना बोलावून आणले. त्या मुलाचे साथीदार आल्यानंतर त्यांनी फिर्यादी प्रीतमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी प्रीतमला आमन मुल्ला व संकेत यांनी पकडून ठेवले.त्यानंतर कैफ याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने लोणकर यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. या घटनेत प्रीतमच्या उजव्या हाताच्या करंगळीवर लागून ते जखमी झाले.

पोलिसांवरही हल्ला

या मुलांचीसुरु असलेली भांडणे पाहून कात्रज चौकात वाहतूक पोलिसांच्या ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई मनोज बदडे तेथे आले. त्यांनीही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रयत्न सुरु असतानाच आरोपी कैफ आरिफने त्याच्या हातावर कोयत्याने वार करत त्यांनाही जखमी केले. या घटनेनंतर कात्रज चौक पोलिसांनी आरोपी कैफ आरिफ शेख याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Vivek Agnihotri यांच्या हिमतीची दाद, The kashmir Files सारखे आणखी सिनेमे यायला हवेत- नवाजुद्दीन सिद्दीकी

Delhi Crime | विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये Gang War, गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Chandrapur : आंतरराज्यीय गांजा तस्करांना अटक, 33 लाखांचा गांजा जप्त

चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.