Varandha Ghat : पुणे महाड मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूचं, स्थानिकांचा जीव मुठीत धरून प्रवास

सध्या सुरूय, त्यावरंध घाट परिसरात पावसाची जोरदार बॅटिंगमुळं दररोज दगड, माती, दरड रस्त्यावर येतायत तसंच घाट रस्ता 4 ठिकाणी खचल्यानं वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.

Varandha Ghat : पुणे महाड मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूचं, स्थानिकांचा जीव मुठीत धरून प्रवास
पुणे महाड मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूचंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 8:50 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या भोर (Pune Bhor) तालुक्यात घाटमाथ्यावर गेल्या 5-6 दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडतोय. पुणे महाड (Mahad) मार्गावरील वरंध घाटात पावसाच्या कोसळणाऱ्या जोरदार सरीमुळे दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. दररोज लहान मोठ्या दरडी घाटामध्ये खाली येताना दिसत आहेत.हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्थानिक नागरिकांना याठिकाणाहून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पथक घाटामध्ये कार्यरत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरची दरड, गटार मोकळी करण्याचं काम सुरु आहे.

घाटमाथ्यावर गेल्या 5-6 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात घाटमाथ्यावर गेल्या 5-6 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुणे महाड मार्गावरील वरंध घाटात पावसाच्या कोसळणाऱ्या जोरदार सरीमुळ दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. दररोज छोटया मोठ्या दरडी घाटामध्ये खाली येत आहेत. हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक नागरिकांना याठिकाणाहून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पथक घाटामध्ये कार्यरत ठेवण्यात आल आहे. त्यांच्याकडून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरची दरड, गटार मोकळी करत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये, घाटात जवळपास 30 ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळेस 2 महिने घाट वाहतुकीसाठी बंद होता, घाटाची तात्पुरती डागडुजी करून हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाने आधिच खबरदारी घेऊन, हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

हे सुद्धा वाचा

वरंध घाट परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

सध्या सुरूय, त्यावरंध घाट परिसरात पावसाची जोरदार बॅटिंगमुळं दररोज दगड, माती, दरड रस्त्यावर येतायत तसंच घाट रस्ता 4 ठिकाणी खचल्यानं वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहतूकीसाठी घाट बंद असला तरी मात्र स्थानिकांना कामासाठी या मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र दरडी कोसळत असल्यानं, त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. 29 जूनला घाटातल्या वाघजाई मंदिराशेजारी दरड कोसळून एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहतुकीसाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून आल्यानंतर अतिवृष्टीचा इशारा असे पर्यंत हा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यातं आलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.