Pune RTO : पुणे आरटीओत इंटरनेट ठप्प, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरं; सामान्यांच्या कामांचा मात्र खोळंबा

पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचा दावाही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर येथे बीएसएनएलचे इंटरनेट वापरले जाते. मात्र बीएसएनएलच्या सेवेत समस्या असल्याचा सूरही अधिकारी काढत आहे.

Pune RTO : पुणे आरटीओत इंटरनेट ठप्प, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरं; सामान्यांच्या कामांचा मात्र खोळंबा
पुणे आरटीओImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:32 AM

पुणे : पुणे आरटीओची (Pune RTO) इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची इंटरनेटची सुविधा मागील तीन दिवसांपासून ठप्प (Internet service down) आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा ही सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे छोट्या आणि किरकोळ कामासाठीही नागरिकांना विनाकारण चकरा माराव्या लागत आहेत. एकीकडे पावसाचे वातावरण (Rain) असताना क्षुल्लक कामासाठी लांबून यावे लागत आहे. त्यात कामही होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन-दोन दिवस याठिकाणी येवून विचारणा करावी लागत असून त्यांना उडवाउडवीची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. नागरिक मात्र यामुळे वैतागले आहेत. पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही नागरिक करीत आहेत.

ताटकळत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

आरटीओमध्ये लायसन्स नूतनीकरण, लर्निंग लायसन्स, डुप्लिकेट लायसन्स, रिक्षा परमीट त्याचबरोबर वाहन ट्रान्सफर आदी कामे केली जातात. ही प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपाची असते. या कामासाठी नागरिक याठिकाणी सकाळपासूनच गर्दी करत असतात. मात्र मागील तीन दिवसांपासून आरटीओचे इंटरनेट ठप्प आहे. नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरेही दिली जात नाहीत. ताटकळत नागरिक वाट पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. शुक्रवारीदेखील येथील इंटरनेट बंद होते. काम होणार नाही, उद्या या, अशी उडवाउडवी येथील अधिकारी-कर्मचारी करताना दिसून येत होते.

तासन् तास वेळ वाया

आरटीओमध्ये तातडीच्या कामांसाठी मोबाइल इंटरनेट वापरण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. मात्र अशी कामे लॅपटॉपवर होत असल्याने अत्यंत कमी वेगात ही कामे होत आहेत. त्यातही केवळ मर्जीतील लोकांचीच कामे केली जात आहे. त्यासाठीही तासन् तास वेळ वाया घालवावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आरटीओ परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने इंटरनेटची समस्या वारंवार होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा

पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचा दावाही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर येथे बीएसएनएलचे इंटरनेट वापरले जाते. मात्र बीएसएनएलच्या सेवेत समस्या असल्याचा सूरही अधिकारी काढत आहे. एकूणच काय तर कधी बीएसएनएलवर तर कधी मेट्रोवर खापर फोडून अधिकारी-कर्मचारी मोकळे होत असले तरी सामान्यांच्या कामाचा मात्र खोळंबा होत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.