इंदापुरात कोरोनाचा कहर; कारागृहातील 16 कैद्यांना कोरोनाची लागण
इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज 16 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. | Indapur prisoner corona positive
इंदापूर : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज 16 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कैद्यांना कोरोनाची लक्षणे आढळली असती त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा रिझल्ट आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (indapur 16 prisoner corona positive)
तुरुंगातील 16 कैद्यांना कोरोनाची लागण
कारागृहातील काही कैदयांना त्रास होत असल्याने काही कैदयांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात 5 कैदयांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर काल पुन्हा त्याच्या संपर्कातील कैद्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 11 कैद्यांचा चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. अशा प्रकारे एकूण 16 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पोलिस कर्मचाऱ्यालाही कोरोना
याच दरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. मात्र प्रशासनाने संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र आता थेट कोरोनाचा शिरकाव कारागृहात झाल्याने प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे.
महाराष्ट्रात दररोज जवळपास 8 ते 9 हजार रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा अधिक वैगाने फैलाव होतो आहे. दररोज जवळपास आठ ते नऊ हजार कोरोनाचे रुग्ण मिळायला लागलेले आहेत. त्यामुळे शासनाने चाचण्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नियम पाळा, कोरोना टाळा
इंदापुरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, अशी विनंती प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी इंदापूर तालुक्याच्या जनतेला केली आहे.
दौंड, बारामती, इंदापुरात कोरोनाला रोखण्याचं आव्हान
दुसरीकडे इंदापूरबरोबरच दौंड आणि बारामतीच्या शहरी आणि ग्रामीण भागांत देखील कोरोनाच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणी, मार्केट अशा ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याने तसंच नियम आणि अटींचं उल्लंघन केल्याने वाढत्या कोरोनाला आमंत्रण दिले जात असल्याचं अधिकारी प्रशासनाचं म्हणणं आहे. त्याचमुळे एकंदरित नागरिकांनी कोरोना नियमांची अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
(indapur 16 prisoner corona positive)
हे ही वाचा :
आता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत! रेल्वे याच महिन्यात सुरु करणार नवी सुविधा