कर्जत जामखेडची निवडणूक कशी जिंकली ते…; अजित पवारांच्या विधानाचा अर्थ काय?
Ajit Pawar on Rohit Pawar Loksabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इंदापूरमध्ये आज सभा पार पडली. यात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी रोहित पवारांच्या निवडणुकीचा दाखला दिला. वाचा सविस्तर...
कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे आमदार आहेत. 2019 ला रोहित पवारांनी इथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीवर अजित पवारांनी भाष्य केलंय. माझ्यावर दमदाटी करतो असा आरोप केला जातो. परंतु सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी मी आवाजात बोललो की दम दिल्यासारखं वाटतं. परंतु माझा आवाज तसा आहे तर मी काय करू? माझा आवाज ही देवाची देणगी आहे. एकदा, दोनदा , तीनदा झालं… इजा बिजा तिजा झालं आता इतरांना द्या ना… इतरांच्या जीवावर किती दिवस निवडून यायचं. कर्जत जामखेड च्या निवडणूक कशी जिंकली मला माहिती आहे. त्याच्या मला खोलात जायचं नाही, असं अजित पवार आहेत. ते इंदापूरमध्ये बोलत होते.
इंदापूरची सभा ही विजयाची सभा ठरावी. भिगवण, दौंड आणि बारामती मधील रेल्वे प्रश्नसाठी निधी मिळाला नाही. नकारात्मकता राजकारणात टिकत नाही. शेतीमधील डबल आळा. 100 पेंडी दिल्यावर पाचूनदा एक द्यावा लागतो हे तरी काही जणांना माहिती आहे का? काही जण पहिल्यांदा आमदार झाले इतकं वटवट करायला लागली, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांवर टीका केली.
रोहित पवारांवर निशाणा
काहीजण म्हणतात 70 हजार कोटी आहेत मी म्हणतो 69 हजार कोटी तुला आणि मी 1 हजार कोटी मला काही बोलतात. ज्याला जिल्हा परिषद तिकीट देण्यास साहेबांनी विरोध केला. त्याला मी तिकीट दिलं. तू ज्या स्कूलमध्ये शिकतो त्याचा हेडमास्तर मी आहे. त्याच्यावर मी बोलणार नाही बोलून मी त्याला मोठा करणार नाही. आम्ही काही बोललो नाही तर लोकांना वाटतं कुठंतरी पाणी मुरतंय. त्यामुळे बोलावं लागतंय , असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं.
स्थानिकांना आवाहन काय?
आपल्याला निवडणुका या नव्या नाहीत. पुढचे २ दिवस महत्त्वाचे आहेत. आज दिवसभरात ४ सभा घेतल्या ही शेवटची सांगता ५ वी सभा आहे. भावनिक होऊन मतदान करुन चालणार नाही कोण आपला विकास करणार हे पाहण महत्वाचं आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आज माझ्यावर काही लोकांनी टीका केली त्यामुळे माझ्या अंगाला काही भोक पडली नाहीत. मी दम देतो असा सारखा प्रचार अनेक प्रचार सभांमधून हे करत आहेत. गेले ३० वर्ष असाच निवडून येत आहे का?, असंही अजित पवार म्हणाले.