Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी इंदापूर शहरात कडकडीत बंद, पाहा काय आहे प्रकरण

इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर शहर बंद पुकारण्यात आलेला होता.

पोलिस निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी इंदापूर शहरात कडकडीत बंद, पाहा काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 8:00 PM

इंदापूर (पुणे) : इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने इंदापूर शहर बंद पुकारण्यात आलेला होता. त्यास शहरातील व्यापाऱ्यांनी तसंच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याने आज इंदापूर शहर 100 टक्के बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर सर्व व्यवहार दिवसभर पूर्णतः बंद होते. (Indapur City Closed Against Indapur PI narayan Sarangkar)

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. निरपराधी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात, असा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांनी केलाय. यासाठी त्यानी 19 डिसेंबर आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी राज्यमंत्री भरणे यांनी मध्यस्ती करत तसंच आश्वासन देत त्या आंदोलनास स्थागिती दिली होती.

यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना फोन लावला व सारंगकर यांच्यावरती काय कारवाई करता येईल? असे विचारले. हा फोन लावण्यापूर्वी भरणे यांनी त्या फोनचा स्पीकर ऑन केला होता. त्यामुळे उपस्थित आंदोलकांना आणि पत्रकारांना अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते हे काय बोलत आहेत हे सर्व तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांना ऐकू येत होते.

मोहिते यांनी सहा तारखेपर्यंत चौकशी करुन कारवाई करु तसेच कारवाई करण्याचे अधिकार माननीय पोलीस विशेष महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना आहेत असे सांगितले. यावरती भरणे यांनी सहा तारखेपर्यंत त्यांच्यावर योग्य कारवाई होईल असे आश्वासन देऊन आंदोलनात स्थगिती देण्याची विनंती केली होती त्यानंतर राहुल मखरे यांनी आंदोलन स्थगित केले होते.

मात्र सहा तारीख उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याने मखरे यांनी शहर बंदची हाक दिली. या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी तसंच नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावरती जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या आठ दिवसात केव्हाही रस्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलकांनी दिला आहे. या वरती आम्ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना संपर्क साधला असता, त्यांना संपर्क होऊ शकला नाही, वेळोवेळी फोन केला मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही… एकंदरीतच या प्रकरणावर ती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ मार्ग काढावा अशी भावना समस्त इंदापूरकरांची आहे….

(Indapur City Closed Against Indapur PI narayan Sarangkar)

हे ही वाचा

लग्न वरतायला नवरदेव थेट हेलिकॉप्टरमधून!

मी भाजपातून निवडून आलो, भाजपातच राहणार; खडसे समर्थक आमदाराचं स्पष्टीकरण

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.