Indurikar Maharaj : अय… मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर राहात जा; शिरूरमध्ये कीर्तन सुरू असतानाच इंदोरीकर महाराजांनी दिला दम

| Updated on: Jun 18, 2022 | 9:59 AM

मोबाइवर कीर्तनाचा व्हिडिओ घेणाऱ्यांना यावेळी चांगलेच सुनावले. मोबाइल बंद कर पहिले, असे म्हणत त्यांनी मोबाइल आणि यूट्यूबवर कीर्तनाच्या क्लीप अपलोड करणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला.

Indurikar Maharaj : अय... मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर राहात जा; शिरूरमध्ये कीर्तन सुरू असतानाच इंदोरीकर महाराजांनी दिला दम
शिरूरमधील कीर्तनावेळी इंदोरीकर महाराज
Image Credit source: tv9
Follow us on

शिरूर, पुणे : माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी, टीआरपीसाठी मला बदनाम केले जात आहे. माझ्या कीर्तनात (Kirtan) कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो. मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो, असे निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) म्हटले आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात कीर्तनावेळी इंदोरीकर महाराजांनी हे विधान केले आहे. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मोबाइल आणि यूट्यूब चॅनेलचा धसकाच घेतला आहे. यांच्यामुळेच आपण बदनाम झाल्याचे ते म्हणाले. कीर्तन सुरू होण्यापूर्वीच इंदोरीकर महाराज मोबाइल आणि यूट्यूब (Youtube) चॅनेलवाल्यांना ते चांगलेच फैलावर घेताना दिसत आहेत. अय.. मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर राहत जा, असे यावेळी त्यांनी सुनावले.

‘टीआरपीसाठी बदनामी योग्य नाही’

इंदोरीकर महाराज यांची कीर्तने राज्यभर होतात. या माध्यमातून आपण समाजप्रबोधन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी कोणी वेगळ्या मार्गाला लागले तर त्याला मार्गावर आणण्याचा प्रयत्न कीर्तनातून केला जातो. पण स्वत:च्या फायद्यासाठी, टीआरपीसाठी कोणाला बदनाम करत असाल तर ते योग्य नाही असे म्हणतानाच मोबाइवर कीर्तनाचा व्हिडिओ घेणाऱ्यांना यावेळी चांगलेच सुनावले. मोबाइल बंद कर पहिले, असे म्हणत त्यांनी मोबाइल आणि यूट्यूबवर कीर्तनाच्या क्लीप अपलोड करणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला तर पाहा, असा दम देतानाच आपल्या पोटापुरते पाहायचे, असे इंदोरीकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यूट्यूब क्लीप टाकणाऱ्यांवर केले होते वादग्रस्त वक्तव्य

कीर्तनाचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून अनेकांनी लाखो रुपये कमावले, असा आरोप इंदोरीकर महाजारांनी काही दिवसांपूर्वी एका कीर्तनात केला होता. अकोल्यातील कौलखेड याठिकाणी आयोजित केलेल्या कीर्तनात त्यांनी हा आरोप केला. जवळपास चार हजार लोकांनी कोट्यवधी रूपये कमावले. त्यांच्यामुळेच आपल्या अडचणीत वाढ झाली आहे, असे म्हणत अशा लोकांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. तर कीर्तन सुरू असताना कोणी मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तरीही ते अलिकडे दम देताना दिसून येतात.