गुवाहाटीत बसण्याऐवजी दिल्लीत जाऊन बसा, सीमाप्रश्नावरून बाळासाहेब थोरात यांनी लगावला टोला
या दाव्याला काही अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे.
पुणे : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आपली तयारी चांगली असली पाहिजे. त्यासाठी हरीश साळवे यांना त्यामध्ये घ्यावं, असा आग्रह आम्ही धरलेला आहे. शेवटी सीमाप्रश्न असतो तेव्हा सर्वपक्षीय एकत्र येतो. मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहत असतो. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री यांना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री अशाप्रकारचं वक्तव्य करतात. त्यातून अनेक गोष्टींचा द्वेष वाढण्याचं काम होतं. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका ठोस ठेवली पाहिजे. ती भूमिका आम्हाला सांगितली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात चांगली बाजू मांडण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात. बसतात. तशी तयारी महाराष्ट्रातून झालेली दिसत नाही. हीसुद्धा काळजीची बाब आहे. गुवाहाटीला जाण्याऐवजी दिल्लीत जाऊन बसलं तर जनतेला आधार वाटेल. तशी काळजी घेणं आवश्यक असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.
भारत जोडो हे राष्ट्रीय कार्य आहे. राज्यघटना आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेससह सर्व पक्षांचे लोकं एकत्र आले. काँग्रेस आपल्या भावना मांडते. ती पद्धती तुम्हाला आक्रमक दिसत नसेल.
एकापुढं एक अग्रेसर झालेत. कोण काय बोलेल, याचा भरोसा नाही. कुटुंबापर्यंत जाऊन पोहचणारी वक्तव्य केली जात आहेत. काँग्रेसच्या भावनाही तीव्र असतात. पण, मांडण्याची पद्धत वेगळी असते. आमच्या आधारस्थानांवर वक्तव्य करणाऱ्यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय. जनतासुद्धा मतांच्या माध्यमातून निषेध करेल, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतील १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, या दाव्याला काही अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. १७ डिसेंबरच्या मोर्च्यात तुम्हाला हे लक्षात येईल.