Ganeshotsav : पुण्यातला गणेशोत्सव हटके अन् गणपतीची नावंही… गुपचूप गणपतीविषयी ऐकलंय का? जाणून घेऊ मंदिराचा इतिहास…

पुण्यातील शनिवार पेठेत गणेशाचे एक ऐतिहासिक मंदिर आहे. याला अगदी ब्रिटिशांच्या आधीच्या काळापासूनचा इतिहास आहे. या गणेश मंदिराचे नाव आहे श्री गुपचूप गणपती मंदिर.

Ganeshotsav : पुण्यातला गणेशोत्सव हटके अन् गणपतीची नावंही... गुपचूप गणपतीविषयी ऐकलंय का? जाणून घेऊ मंदिराचा इतिहास...
पुण्याच्या शनिवार पेठेतला गुपचूप गणपतीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 2:43 PM

अभिजीत पोते, पुणे : पुण्यात अशा अनेक गोष्टी मिळतील, ज्या जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत. सध्या राज्यभर गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav) धूम सुरू आहे आणि त्यातच पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आकर्षणाच जणू… राज्यभरातून याठिकाणी गणेशोत्सव पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करीत असतात. पुण्यातला गणेशोत्सव जसा सगळीकडे प्रसिद्ध तशीच पुण्यातील काही जुन्या गणपती मंदिरांची नावेदेखील हटके आहेत. मोदी गणपती, माती गणपती इतकेच नाही तर पुण्यात गुपचूप गणपतीदेखील (Gupchup Ganpati) आहे. होय… पुण्यातील शनिवार पेठेत गणेशाचे एक ऐतिहासिक मंदिर आहे. याला अगदी ब्रिटिशांच्या आधीच्या काळापासूनचा इतिहास आहे. या गणेश मंदिराचे नाव आहे श्री गुपचूप गणपती मंदिर. पण या गणपतीला गुपचूप गणपती का म्हणतात तर त्याचा एक इतिहास (History) आहे.

नावाप्रमाणेच इतिहासही अनोखा

श्रीरामचंद्र विष्णू गुपचूप हे पुणे जिल्हातील चिंचवड जवळील ताथवडे (Tathawade) या गावचे. ते मोरेश्वर शास्त्री रावजी शास्त्री दीक्षित यांचे निष्ठावंत शिष्य होते. त्यांनी शास्त्रीबुवांकडून उपासना घेतली होती. या दोघांचीही गणेशावर अढळ श्रद्धा होती आणि दोघेही गणेशाचे एकनिष्ठ भक्त होते. श्री मोरेश्वर शास्त्रींनी श्री गुपचूप यांना श्री गजाननाची मूर्ती दाखवून आपला मानस, विचार सांगितला. ते ऐकून ते आनंदाने हर्षभरीत झाले. तोच हा गुपचूप वरद विनायक गणपती… याचे नाव जसे अनोखे तसेच या गणेश मंदिराचा इतिहासदेखील अनोखा आहे.

मंदिराचा इतिहास

1961मध्ये ज्यावेळी पुण्यातले पानशेत धरण फुटून पुण्यात पूर आला होता, त्यावेळी हे मंदिर जवळपास 28 तास पाण्यात होते. या पुरात मंदिराचा सगळा भाग वाहून गेला, पण गाभारा आणि देवाची मूर्ती त्यासोबतच लाकडी खांब तशीच राहिली. नंतर चार वर्षांनी हे मंदिर उभे करण्यात आले. या मंदिरात जवळपास 100 वर्ष जुन्या पेंटिंग आहेत. या पेंटिंग म्हणजे हिंदू धर्मात असणारे चार युग. त्या त्या युगातील गणपतींची प्रतिमा या पेंटिंगमध्ये साकारण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

साध्या पद्धतीने गणेशोत्सव…

या मंदिराला जवळपास 130 वर्ष पूर्ण झाली असून इथे अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. 12 फेब्रुवारी 1892 या दिवशी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. एका पाषाणातील मूर्तीवर शेंदूर चढवून शास्त्रोक्त पद्धतीने ही मूर्ती बनवली आहे. पुढे 1894मध्ये पांचरवणी सभा मंडप बांधण्यात आला. तो तिघई दुमजली असून देवाच्या गाभाऱ्यावर 4 लहान शिखरे आहेत. संपूर्ण दगडी बांधणीचा गाभारा असून प्रदक्षिणेच्या वाटेवर मोठा शमीवृक्ष आहे. गणेशाची मूळ मूर्ती काळ्या पाषाणाची असून शेंदूर लेपाने त्याला आकार आणला आहे. चतुर्भुज, डाव्या सोंडेची, मांडी घातलेली, 3 फुटांची गणेश मूर्ती विराजमान आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.