‘सचिन वाझेंना 100 कोटींचं टार्गेट दिलं असेल काय?’, IPS कृष्णप्रकाश यांचं बेधडक उत्तर
गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत, असं म्हणत आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं डॅशिंग आयपीएस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले. | IPS krishna prakash
पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एपीआय सचिन वाझे ()Sachin Vaze यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं असेल काय?, असा प्रश्न पत्रकारांनी डॅशिंग आयपीएस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांना विचारला. त्यावर त्यांनी बेधडकपणे उत्तर देत गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत, असं म्हणत आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं. (IPS krishna prakash Statement on Anil deshmukh 100 Crore Target Sachin Vaze parambir singh letter)
गृहमंत्र्यांवर होणारे आरोप मनाला न पटणारे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. त्यामध्ये वाझेंना 100 कोटी रुपयांचं दर महिन्याला टार्गेट दिलं होतं, या दाव्याने महाराष्ट्राचं पोलिस दल तसंच राजकीय वर्तुळही हादरलं. हाच प्रश्न आयपीएस कृष्णप्रकाश यांना विचारला असता हे मनाला न पटणारे आरोप असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चुकीचं काम करणाऱ्यांना टार्गेट दिलं जातं
राज्याचा गृहमंत्री एका एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला 100 कोटी रुपयांचं टार्गेट देईल, ही गोष्ट मनाला पटत नाही. चुकीचं काम करणाऱ्यांना टार्गेट दिलं जातं. पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे, असं कृष्णप्रकाश यांनी सांगितलं.
ते पत्र व्हायरल, मी त्याच्यावर बोलणार नाही
पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीसंदर्भातलं पत्र व्हायरल झाले. त्या संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, असं कृष्णप्रकाश म्हणाले.
शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही
शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याने केलेल्या चुकीचं शासन त्याला होईल, असंही कृष्णप्रकाश म्हणाले.
(IPS krishna prakash Statement on Anil deshmukh 100 Crore Target Sachin Vaze parambir singh letter)
हे ही वाचा :