दहशवादी यासिन भटकळचे वकील ॲड.जहीरखान पठाण यांना इसिसने दिली धमकी; काय आहे प्रकरण
या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडा, निघून जा नाहीतर तुमच्या जीवाचे बरे वाईट करेल (युअर लाइफ इन डेन्जर. माय पर्सन विथ मिट यू) अशी धमकी दिली. तसेच त्याने धमकी देत इसिसचा माणूस असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे .
पुणे – दहशतवादी यासिन भटकळचे तत्कालिन वकील ॲड.जहीरखान पठाण(Adv. Zaheer Khan Pathan) यांना इसिसकडून(ISIS) जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशवादी यासिन भटकळ हा शहरातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीपैकी एका मुख्य आरोपी होता. या खटल्याच्यावेळी ॲड. पठाण यांनी भटकळ याचे वकीलपत्र घेतले होते. इसिसकडून मिळालेल्या धमकीनंतर ॲड. पठाण यांनी सरन्यायाधीश, पंतप्रधान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, जिल्हा न्यायाधीश पुणे, पुणे बार असोसिएशन आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta)यांना तक्रार अर्ज सादर केला. या अर्जाद्वारे त्यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले ॲड. पठाण
ॲड.पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका व्यक्तीचा चेन्नईतील मोहंमद दाऊद यांसोबत करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता.यातून आर्थिक फसवणूक झाली आहे, या गुन्हयात दाऊद संशयित आरोपी आहे. याबाबतच खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे. च्यातर्फे ॲड. पठाण कामकाज पाहतात. ॲड. पठाण या प्रकरणाच्या तडजोडीनिमित्त चेन्नई येथे गेले होते. तेथे सचिन टेमघिरे याने संबंधित व्यक्तीच्या वतीने येथून पुढे माझ्या ऐवजी मौलाना नावाचा माणूस बोलेल असे त्यांना सांगण्यात आले. पुढे मौलाना नावाच्या व्यक्तीने पठाण यांच्याशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने पठाण यांना मेसेज करत या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडा, निघून जा नाहीतर तुमच्या जीवाचे बरे वाईट करेल (युअर लाइफ इन डेन्जर. माय पर्सन विथ मिट यू) अशी धमकी दिली. तसेच त्याने धमकी देत इसिसचा माणूस असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे .
योग्य ती कारवाई करण्यात येणार
या तक्रारी बद्दल बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले , की ॲड. पठाण यांना धमकी दिल्याबाबतच अर्ज त्यांनी आमच्यकडे केला आहे. या अर्जाची दखल घेत, त्यावर पुढील योग्यती कार्यवाही करण्यात येणार आहे.