Pune crime | पुण्यात शॉर्ट्स घालून फिरल्याच्या कारणावरून आयटी इंजिनिअर तरुणींना चप्पलने मारहाण
पीडित मुली खराडी येथील आयटी कंपनीत कार्यरत आहेत तर खराडीमधील फेज दोनमध्ये अनुसया पार्क लेक्सीस सोसायटीत या मुली पीजी म्हणून वास्तव्यास आहेत. या प्रकरणी सोसायटीत वास्तव्यास असणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे – पुण्यात शॉर्ट्स (Shorts)घालून फिरत असल्याच्या करणावरुन आयटी इंजिनिअर (IT Engineer)तरुणींना चप्पलांनी मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तीन तरुणींनी चंदननगर पोलिसात(Chandannagar police) तक्रार दिली आहे. पीडित मुली खराडी येथील आयटी कंपनीत कार्यरत आहेत तर खराडीमधील फेज दोनमध्ये अनुसया पार्क लेक्सीस सोसायटीत या मुली पीजी म्हणून वास्तव्यास आहेत. या प्रकरणी सोसायटीत वास्तव्यास असणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुली पीजी म्हणून राहत असलेल्या घर मालक महिलेचे पती कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्या घरी एकट्याच असतात. आपल्या सोबतीला कोणी तरी हवे या उद्देशाने त्यांनी या तीन मुलींना पीजी म्हणून राहण्यास जागा दिली होती. मात्र याचाच राग आरोपीच्या कुटुंबीयांना असल्याने त्यांनी हे कृत्य केलं आहे.
तर झालं असं की
खराडी परिसरात फेज दोनमध्ये अनुसया पार्क लेक्सीस या सोसायटीत पीडित मुली पीजी म्हणून वास्तव्यास आहेत. या ठिकाणी वास्तव्य करत असताना या मुली अनेकदा शॉर्ट्स घालून वावरत असत. मात्र मुलींकडून केल्या जाणाऱ्या पेहरावरून सोसायटीता राहणाऱ्या कुटुंबाने मुली राहत असलेल्या घर मालक यांच्याकडे मुलींच्या राहणीमानावरुन विचारणा केली. त्यावर संबंधित घर मालकाने मुलींनी काय घालावे, कसे राहावे तो मुलींचा प्रश्न आहे. असे सांगितले. मात्र घरमालकाने दिलेल्या उत्तराचा आरोपीच्या कुटुंबियांना राग आला. यानंतर आरोपीच्या कुटुंबातील ५५ वर्षीय महिलेने रात्रीच्या वेळी फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुली रहात असलेल्या रूममध्ये जात त्यांनाही चप्पलने मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या मुलींनी घरमालकिणीच्या मदतीने चंदननगर पोलिसात तक्रार केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करत आहेत.
Video – भंडाऱ्याच्या शिवसेना आमदारांची नितीन गडकरींना साद, भाजप-शिवसेना युतीचे जुने दिवस येतील का?
Fashion Tips : स्टायलिश आणि मनमोहक लूकसाठी हे सुंदर लेहेंगे एकदा नक्की ट्राय करा!
IND vs SL 1st Test: अनुष्का शर्माचं मैदानावर काय काम? सोशल मीडियावर घमासान, नेटीझन्स आपसातच भिडले