Pune Weather | पुण्यात आज पावसाचं पुनरागमन होणार, रात्री जोरदार पावसाचा अंदाज

| Updated on: Aug 30, 2021 | 10:51 AM

पुण्यात मागचे अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाने आजपासून पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यात पुणे आणि परिसरातही अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

Pune Weather | पुण्यात आज पावसाचं पुनरागमन होणार, रात्री जोरदार पावसाचा अंदाज
weather
Follow us on

पुणे : पुण्यात मागचे अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाने आजपासून पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यात पुणे आणि परिसरातही अनेक भागात पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर अनेक भागात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (It is likely to rain heavily in Pune today after several days)

ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला

पुण्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर गेल्या आठवड्यात तापमानात अचानक वाढ झाली होती. दिवसाचं सरासरी तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं होतं. दिवसा उन्हाचा चटका जाणवत होता तर रात्रीचं सरासरी तापमानही काहीसं वाढल्याचं जाणवत होतं. पण काल आणि आज अनेक भागात सूर्याचं दर्शन झालेलं नाही. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला आहे.

रात्रीच्या वेळी 9.4 मिमीपर्यंत पाऊस पडण्याच्या अंदाज

आज पुण्यात दिवसाचं सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे. पाऊस पडल्यानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दिवसा 38 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर वाऱ्यात आर्द्रतेचं प्रमाण हे 61 टक्के आहे. दिवसभरात पावसाच्या एक किंवा दोन सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवसभरात 2.8 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रात्री तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकतं. रात्रीच्या वेळी 9.4 मिमीपर्यंत पाऊस पडण्याच्या अंदाज आहे.

विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌लर्ट

हवामान विभागानं सोमवारी परभणी जिल्ह्याला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, जळगाव, बुलडाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌लर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

जून महिन्यात हवामान विभागानं यंदाचा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तवला होता. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उघडीप दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. पीक वाचवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झालं होतं.

जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

इतर बातम्या :

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचा मोठा निर्णय, ‘श्रीं’च्या दर्शनासाठी करणार ‘ही’ खास सोय

तीन दिवसांच्या खंडानंतर पुण्यात आज लसीकरण, पाहा कोणत्या केंद्रावर किती मिळणार लस

नो टेन्शन! सध्या नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राशिवाय मिळणार अकरावी प्रवेश