ना पत्ता, ना फोन… मुलाच्या भेटीसाठी आसुसलेला बाप, रोहिणी खडसेंच्या मदतीने मुलाचा शोध, बापलेक भेटीने गहिवरले

अखेर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि मोहसिन पठाण यांच्या मदतीमुळे त्या नशिबवान बाप-लेकाची भेट झाली.

ना पत्ता, ना फोन... मुलाच्या भेटीसाठी आसुसलेला बाप, रोहिणी खडसेंच्या मदतीने मुलाचा शोध, बापलेक भेटीने गहिवरले
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 7:33 PM

बारामती (पुणे) : लेकाची भेट होईल या आशेने बाप पायाला भिंगरी लावल्यागत डोळ्यात अश्रू घेऊन उपाशीपोटी 4 ते 5 दिवस बारामतीच्या गल्लोगल्ली फिरत होता. फक्त मुलाचा काही पत्ता लागेल या आशेनेच त्याने बारामतीचा कौपरा ना कोपरा धुंडाळला. यादरम्यान एक ना अनेक विचारांनी त्या बापाच्या मनात काहूर माजलं. अखेर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि मोहसिन पठाण यांच्या मदतीमुळे त्या नशिबवान बाप-लेकाची भेट झाली. (Jalgaon Srikrishna Sonawane Father And Son meet in Baramati with the help of Rohini Khadse)

बारामती एमआयडीसीत काम करणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी इच्छापूर (जि. जळगाव) येथून मुलाचे वडील श्रीकृष्ण सोनवणे आले होते. मुलाने दिलेला नंबर लागत नाही त्यामुळं ते बारामतीत सैरभैर फिरत होते. मुलाचा पत्ताही त्यांना माहिती नव्हता. त्यामुळे मुलाचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या.

मुलाच्या शोधात वडील 4 ते 5 दिवस उपाशीपोटी फिरत होते. या दरम्यान, बारामतीतील श्रीरामनगर भागात त्यांची निखिल येडगे यांच्याशी भेट झाली. सोनवणे यांनी निखिल यांना सर्व परिस्थिती सांगितली. परिस्थिती लक्षात येताच निखिल येडगे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव मोहसिन पठाण यांच्याशी संपर्क साधला. लागलीच पठाण यांनी श्रीकृष्ण सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

श्रीकृष्ण सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील असल्याने मोहसीन पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. रोहिणी खडसे यांनी लगोलग सूत्रं फिरवली तसंच आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. इच्छापूरचे सरपंच मुन्ना बोंडे यांना सोनवणे यांच्या घरी पाठवून मुलाचा संपर्क क्रमांक व पत्ता मिळवण्यास सांगितले. त्यानुसार बोंडे यांनी मुलाच्या घरी जाऊन कागदपत्रांची माहिती घेऊन मुलगा, संबंधित कंपनीची माहिती पठाण यांना कळवली. मिळालेल्या माहितीनुसार पठाण यांनी कंपनीत जाऊन मुलाशी संपर्क साधून बाप-लेकाची भेट घडवून आणली.

आपल्या मुलाचा शोध घेत श्रीकृष्ण सोनवणे हे गेले अनेक दिवस फिरत होते. त्यात संपर्काचं कसलंही साधन नसल्याने ते चिंतेत होते. मात्र बारामतीत आल्यानंतर त्यांची अवस्था पाहून त्यांना मदतीचे हात मिळाले आणि त्यांची आपल्या मुलाशी भेट झाली. मुलाला भेटल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. रोहिणी खडसे, मोहसिन पठाण यांच्यामुळे आपण मुलाला भेटू शकल्याची भावना त्यांनी भेटीनंतर व्यक्त केली.

(Jalgaon Srikrishna Sonawane Father And Son meet in Baramati with the help of Rohini Khadse)

हे ही वाचा

‘पुणे तिथे काय उणे’! पुणे महाराष्ट्रातील सर्वात ‘आनंदी’ जिल्हा

उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.