Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण, त्यांनी प्रोटेक्ट करायला हवं होतं : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Jayant Patil) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला.

किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण, त्यांनी प्रोटेक्ट करायला हवं होतं : जयंत पाटील
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 12:28 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Jayant Patil) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हिजाब, किरीट सोमय्या, (Kirit Somiaya) महाविकास आघाडी, चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात भाष्य केलं. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्यांना गेल्या आठवड्यात झालेल्या धक्काबुक्कीवर देखील जयंत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण आहे. त्यांना सीआयएसएफ ने प्रोटेक्ट केले पाहिजे होतं. यात ते कमी पडले आहेत याचा अर्थ आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्या घटनेवरुन मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात येतो मात्र मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत असं अजिबात नाही. त्याला महत्व देणं योग्य नाही. सत्ता नसल्यानं भाजपचं मोरल कमी होत चाललं आहे, असंही ते म्हणाले.

मुद्दाम काही विषय तयार करण्याचा प्रयत्न

हिजाबवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर बोलताना भारतीय घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कुणाचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाहीत. काही ठिकाणी जे चालू आहे तिथे वेगळी भूमिका घेऊन मुद्दाम हा विषय तयार करणे हा प्रयत्न आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

एकत्र लढण्याचा प्रयत्न

मनपा निवडणूक तीन पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न असेल. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी एकत्र यावं, असंही जयंत पाटील म्हणाले. अनिल देशमुख यांच्याबद्दल विचारलं असता चांदिवाल कमिशनच्या समोर वाझे यांनी सांगितले होते अनिल देशमुख माझी कधी भेट झाली नाही. आता त्यांना कोणी मॅनेज करून ते बोलायला पाडत असेल, असं जयंत पाटील म्हणाले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ही आमची भूमिका आहे. छगन भुजबळांनी बैठकीत सगळी माहिती दिली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको आहेत. भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करतंय हे सर्वश्नूत आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याचं जयंत पाटलांनी समर्थन केलं आहे.

इतर बातम्या:

पती-पत्नी सोबत राहू शकत नसतील, तर एकमेकांना सोडलेलं बरं : सुप्रीम कोर्ट

घटस्फोटानंतर नवऱ्याकडून भरमसाठ पोटगी वसूल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्री

Jayant Patil statement on Kirit Somaiya attack by Shivsena workers in pune

साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.