पुणे : पुण्यात देशातील पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे (Hydrogen Fuel Cell Bus) अनावरण करण्यात आले आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग (Jitendra Singh) यांनी नुकतेच या बसचे अनावरण केले. जगभरातील देशांमध्ये ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी काम सुरू आहे. पाश्चात्य देश पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करत आहेत. सध्या इलेक्ट्रिक वाहने या सर्वांना पर्याय बनत आहेत. परंतु भविष्यात यापेक्षाही चांगले तंत्रज्ञान आपल्यासमोर असेल आणि भारत त्यात क्रांती घडवू शकणार आहे ते हायड्रोजन आणि हवा वापरून धावणाऱ्या बसच्या वापराने. ही बस CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) आणि KPIT लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. त्यात या बसची झलकही दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनने प्रेरित होऊन, KPIT CSIRने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित “हायड्रोजन फ्युएल सेल बस”चे अनावरण पुण्यात करण्यात आले.हा इंधन सेल हायड्रोजन आणि हवेचा वापर करून वीज निर्माण करतो आणि बसला उर्जा देतो, ज्यामुळे ती एक पर्यावरण-अनुकूल वाहतुकीचा एक पर्याय बनतो. डिझेल बसशी तुलना केल्यास, ती लांब पल्ल्याच्या मार्गांवर दरवर्षी 100 टन CO2 उत्सर्जित करते.
VIDEO: Inspired by PM Sh @NarendraModi‘s National Green Hydrogen Mission, unveiled India’s first indigenously developed Hydrogen Fuel Cell Bus developed by KPIT-#CSIR at #Pune, supported by Union Ministry of Science & Technology. pic.twitter.com/pNtEj9h5xw
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) August 21, 2022
देशभरात लाखो डिझेल बस आहेत. याविषयी डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, की हायड्रोजन फ्युएल सेल ट्रकचा वापर खर्च डिझेल बसच्या तुलनेत कमी आहे. संपूर्ण देशात, विशेषतः मालवाहतुकीच्या क्षेत्रात हा पर्याय क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो. डॉ. जितेंद्र सिंग पुढे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हायड्रोजन व्हिजन’चा उद्देश भारताला हवामान बदलाची उद्दिष्टे, स्वच्छ ऊर्जा तसेच स्वच्छ ऊर्जा पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी बनवणे आहे.
सुमारे 12-14 टक्के CO2 उत्सर्जन डिझेलवर चालणाऱ्या अवजड वाहनांमधून होते. हायड्रोजन इंधन सेल वाहने रस्त्यावरील कार्बन उत्सर्जन दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. लवकरच अशा बसेस रस्त्यावर धावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.