Pune : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण डोक्याला मार लागला; गंभीर दुखापत होऊन बारामतीत तरुणाचा मृत्यू

घटनेनंतर घरातील व नातेवाईकांनी विहिरीवर जावून गावकऱ्यांच्या मदतीने प्रशांतला विहिरीच्या बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या कपाळाला गंभीर जखम झाल्याचे त्यांना दिसून आले. त्याला रुग्णवाहिकेमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Pune : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण डोक्याला मार लागला; गंभीर दुखापत होऊन बारामतीत तरुणाचा मृत्यू
विहीर (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 3:07 PM

पुणे : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला आहे. बारामतीतील झारगडवाडीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. हा तरूण विहिरीत पोहण्यासाठी (Swim in the well) गेला होता. त्याने डोक्यावर पाण्यात उडी घेतली त्यातच त्याचा जीव गेला. शनिवारी दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. प्रशांत रामभाऊ घाळे असे या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत घाळे हा युवक आपल्या लहान भाच्यांना घेवून दुपारी बाराच्या दरम्यान गावालगत असलेल्या एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी प्रशांतने विहिरीत उडी (Jump) मारली मात्र तो थेट विहिरीतील कपारीला धडकला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत (Seriously injured) झाली. यामध्ये तो बराच वेळ विहीरीच्या पाण्यातून बाहेर आला नाही. मग यावेळी विहीरीवर बसलेल्या भाच्यांनी आरडाओरडा करत घर गाठले व घरातील कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

उपचारापूर्वीच मृत घोषित

कालच प्रशांत घाळे याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्याने घरी अनेक पाहुणे मंडळी मुक्कामी होते. घटनेनंतर घरातील व नातेवाईकांनी विहिरीवर जावून गावकऱ्यांच्या मदतीने प्रशांतला विहिरीच्या बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या कपाळाला गंभीर जखम झाल्याचे त्यांना दिसून आले. त्याला रुग्णवाहिकेमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हे सुद्धा वाचा

सावधानता बाळगण्याचे आवाहन

प्रशांत घाळे याच्या मागे आई, वडील, पत्नी, सहा वर्षांची मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, याबाबतचा अधिक तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात अनेक ठिकाणी तरूण पोहायला जातात. मात्र उंचावरून उडी मारताना सराव गरजेचा असतो, अन्यथा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. उंचावरून उडी मारताना विहिरीत खडक अथवा इतर दगडाला डोके आपटणार नाही, हे पाहायला हवे. अन्यथा अपघात घडण्याची भीती बळावते. त्यामुळे याबाबत पोलिसांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.