“कर्नाटक निकालाचे दुरगामी परिणाम होणार नाहीत”; भाजपच्या नेत्याने काँग्रेसच्या विजयाचं विश्लेषण केलं

भाजपला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील या निवडणुकीत पराभव झाल्याचा सर्व बाजूने विचार केला जाईल असंही त्यानी यावेळी सांगितले आहे.

कर्नाटक निकालाचे दुरगामी परिणाम होणार नाहीत; भाजपच्या नेत्याने काँग्रेसच्या विजयाचं विश्लेषण केलं
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 7:40 PM

इंदापूर : साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि काँग्रेसच्या विजयावर शिक्का मोर्तब झाला. कर्नाटक विधानसभेच्या निकालानतंर आता महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही आगामी काळातील निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे आता भाजपच्या नेत्याने कर्नाटक राज्याने दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याचे सांगत या निकालाचा आगामी काळातील कोणत्याही निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटक राज्यात जरी काँग्रेसला विजय प्राप्त झाला असला तरी त्या निवडणुकीचा कोणताही परिणाम भाजपच्या राजकीय प्रवासावर होणार नाही.

मात्र कर्नाटकात आम्ही कुठे कमी पडलो, नेमका पराभव कसा झाला त्याचा आता विचार केला जाईल असंही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील या निवडणुकीत पराभव झाल्याचा सर्व बाजूने विचार केला जाईल असंही त्यानी यावेळी सांगितले आहे.

कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये जो मतदारांना कौल दिला आहे, त्याबद्दल आम्ही कोणत्याही प्रकारचे दुमत व्यक्त केले नाही मात्र कर्नाटकच्या निवडणुकीत जनतेने जो कौल दिलेला कौल आम्ही मान्य करत.

भाजपच्या अपेक्षेपेक्षा कमी मतदान या निवडणूकीत झाले आहे त्याचं आत्मपरीक्षण केलं जाईल असं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

या पराभवाला स्थानिक कारणंही असू शकतात. मात्र या निकालाचे कोणतेही दुरगामी परिणाम भारतीय जनता पार्टीवर होणार नाहीत.

याउलट येणाऱ्या प्रत्येक निवडणुका मोठ्या ताकदीने लढवल्या जातील आणि मतदारांचा भाजपवर असलेला विश्वास त्या निवडणुकांतून दिसून येईल असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.