Kasba by election Result : शरद पवार यांनी दिलेला ‘तो’ आशिर्वाद खरा झाला, विजयानंतर धंगेकर यांच्या पत्नींची पहिली प्रतिक्रिया!

कसबो पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला आशिर्वाद खरा झाल्याची प्रतिक्रिया धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी दिली.

Kasba by election Result : शरद पवार यांनी दिलेला 'तो' आशिर्वाद खरा झाला, विजयानंतर धंगेकर यांच्या पत्नींची पहिली प्रतिक्रिया!
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 2:02 PM

पुणे : पुण्याच्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. 28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 इतकी मते मिळाली असून त्यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय जनतेचा असून मी केलेल्या 30 वर्ष सातत्याने केलेल्या कामाचा विजय असल्याचं रविंद्र धंगेकर म्हणाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला आशिर्वाद खरा झाल्याची प्रतिक्रिया धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी दिली.

रविंद्र धंगेकर यांचा अभिमान वाटत असून बहुमतांनी आमचा विजय झाला आहे. शरद पवार यांनी यशस्वी होण्याचा दिलेला आशिर्वाद खरा झाला आहे. मागील पराभवानंतर त्यांनी मी नक्की निवडून येईल असं सांगितलं होतं. मनात कोणतीही धाकधूक नव्हती आणि महाविकास आघाडीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरला असल्याचं प्रतिभा धंगेकर यांनी सांगितलं आहे.

भाजपने प्रचंड ताकद लावलेली होती आणि प्रतिष्ठेची लढत होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या विजयाचं श्रेय महाविकास आघाडी आणि कसब्यातील जनतेला देणार आहे. भाजपचा गड कधी नव्हताच त्यांनी हा फुगवलेला फुगा होता तो आता फुटला आहे. मोठ्या मतांनी विजय मिळेल अशी अपेक्षा होती, असं प्रतिभा धंगेकर म्हणाल्या.

जनतेने ठरवलं होतं रविंद्र धंगेकरला विधानसभेत पाठवायचं. त्यामुळे पैशांचा पाऊस पडला असला तरी मतांचाही पाऊस पडला असून जनतेने पैशाला भीक घातली नसल्याचं रविंद्र धंगेकर म्हणाले. माझ्या विजयाचं श्रेय जनतेला आणि मतदारराजाला देणार असल्याचंही धंगेकर यांनी म्हटलं असून हा विजय महाविकास आघाडीचा आहे, असं धंगेकर म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) हे विजयी झाले आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रविंद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. गिरीश बापट ( Girish Bapat ) यांचे नेहमीच वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभाव स्वीकारावा लागलाय.

राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.