Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीतपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरलं; पुण्यातील पाणीकपात रद्द होणार?
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 1:53 PM

पुणे: पुण्यातील (Pune) खडकवासला (Khadakwasla) धरण 100 टक्के भरलं आहे. सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) पडत असून, पावसामुळे जवळपास सर्वच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. पुणेकरांना खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. जून महिन्यात म्हणावा असा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होतो. खडकवासला धरणाची पातळी देखील कमी झाली होती. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरलं आहे. धरण भरल्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दुसरीकडे या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे.

शेतीला फटका

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आणि पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र पाऊस उघडत नसल्याने सध्या दुबार पेरणी देखील शक्य नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने पिवळी पडली आहे. तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे. पाण्यामुळे अनेकांना स्थलांतर करण्याची वेळी आली आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात सर्वदूर पाऊस

जुलै महिन्यात राज्यातील जवळपास सर्वच विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पुणे, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे  आलेल्या पुराचा फटका अनेकांना बसला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. नद्या काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवत असून, त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.