दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘शाहीन बाग’च्या धर्तीवर ‘किसान बाग’ आंदोलन

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतीलच शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 'शाहीन बाग'च्या धर्तीवर 'किसान बाग' आंदोलन
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:44 PM

सोलापूर : राजधानी दिल्लीच्या सीमेवर 2 महिन्यांपासून अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतीलच शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी किसान बाग आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला आज राज्यभरात सुरुवात होत आहे. सोलापुरातही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान बाग आंदोलनाला सुरुवात झाली आहे.(Kisan Bagh Andolan started in Maharashtra on the lines of Shaheen Bagh in Delhi from the VBA)

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट इथं सुरु झालेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्याची घोषणा केलीय. देशात शाईन बाग आंदोलन झालं तसंच महाष्ट्रात किसान बाग आंदोलन करण्याचा वंचितचा संकल्प आहे.

प्रकाश आंबेडकरांची हाक

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील शाईन बाग आंदोलनासारखं राज्यात किसान बाग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या आंदोलनासाठी अनेक मुस्लीम संघटनांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय. राज्यभर हे आंदोलन होणार असून शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे आंदोलनाचे स्वरूप असेल. राज्यभरातील लाखो मुस्लीम बांधव या आंदोलनात उतरणार आहेत.

कसं होतं शाहीन बाग आंदोलन?

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीच्या रस्त्यावर शाहीन बाग आंदोलन झालं होतं. यामुळे त्या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत गाजलेला हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला होता. दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेला रस्ता सुरु करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानंही रस्ता ठप्प करणाऱ्या शाहीन बाग इथल्या आंदोलकांना झापलं होतं.

शाहीन बाग आंदोलनामुळे 13ए रोड पूर्णपणे बंद होता. हा रस्त्या दिल्ली आणि नोएडाला जोडतो. रस्ता बंद झाल्यामुळे नोएडा आणि दिल्लीतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जाव लागत होतं.

संबंधित बातम्या : 

शाईन बागच्या धर्तीवर महाराष्ट्रात किसान बाग आंदोलन होणार, वंचितची मोठी घोषणा

दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट: नवाब मलिक

Kisan Bagh Andolan started in Maharashtra on the lines of Shaheen Bagh in Delhi from the VBA

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.