Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताईला बघून म्हणाली, मी सुद्धा पोलीस होणार, मग ठरलं, शेतकऱ्याच्या सहा लेकी पोलीस दलात!

पाच बहिणी पोलीस दलात कार्यरत असल्याचा आदर्श घेऊन पोलीस दलात भरती झाले, असं सुजाता भोसले सांगतात. (Sujata Bhosale Kolhapur Maharashtra Police)

ताईला बघून म्हणाली, मी सुद्धा पोलीस होणार, मग ठरलं, शेतकऱ्याच्या सहा लेकी पोलीस दलात!
भोसले कुटुंबातील रणरागिणी
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 6:29 PM

कोल्हापूर : कोल्हापुरी बाणा काय असतो हे कोल्हापूरमधील भोसले कुटुंबीयांनी दाखवून दिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील भोसले कुटुंबानं सहा मुलींना पोलीस दलात भरती करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. एकाच घरातील सहा मुली पोलीस असणारे राज्यातील हे बहुदा पहिलंच कुटुंब असावं. सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. 2017 मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेल्या सुजाता भोसले यांनी 5 बहिणी पोलीस दलात सेवा बजावत असल्याचा आदर्श घेऊन पोलीस दलात येण्याचं ठरवल्याचं सांगतात.( Kolhapur Bhosale family six daughters working in Maharashtra Police Department Home Minister Anil Deshmukh and Satej Patil appreciate them)

आम्ही देखील शेतकऱ्यांच्या लेकी…

सर्व मुलींनी स्वत:ला कमी लेखू नये. आम्ही देखील शेतकऱ्याच्या मुली आहोत. शेतातील कामे करुन अभ्यास करुन पोलीस दलात भरती झालो. स्वत:ला कमी लेखू नका येणाऱ्य पोलीस भरतीची तयारी करा आणि अर्ज करा, असं आवाहन सुजाता भोसले यांनी केले आहे. सुजाता सुरेश भोसले सांगतात की,आमच्या भोसले कुटुंबात आम्ही 6 जण पोलीस आहोत. 5 बहिणींचा आदर्श घेऊन पोलीस दलात येण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात भरतीचा अर्ज भरला आणि त्यामध्ये भरती झाले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असल्याचं सुजाता भोसले सांगतात.

अडथळे पार करत पोलीस दलात भरती

मुलींनी किती ही यशाची शिखर गाठली तरी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन अशी मानसिकता आज ही समाजात पाहायला मिळते.पण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातलं भोसले कुटुंब याला अपवाद ठरलंय. कारण या कुटुंबातील सहा लेकी पोलीस सेवेत आहेत..आज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या या लेकी लोकांच्या रक्षणाच व्रत जोपासत आहेत.वाघवे गावात असलेल्या खोतवाडीमध्ये सुरेश रंगराव भोसले, चंद्रकांत रंगराव भोसले आणि प्रकाश रंगराव भोसले हे तिघे भाऊ राहतात. सुरेश भोसले यांना 4 मुली आणि 2 मुले तर, चंद्रकांत भोसले यांना तीन मुली आहेत. तर प्रकाश भोसले गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, सुरेश भोसले आणि चंद्रकांत भोसले गावातच राहतात आणि शेती करतात.

सुवर्णा भोसले, सोनाली भोसले 2008 ला पोलीस सेवेत

सुरेश भोसले यांच्या तीन मुली सारिका भोसले, सुवर्णा भोसले आणि सुजाता भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. त्यांचा लहान भाऊ सोमनाथ भोसले सुद्धा आता भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तर, चंद्रकांत भोसले यांच्या रुपाली, सोनाली, सर्वात लहान विमल भोसले या तिघी सुद्धा पोलीस झाल्या आहेत. यामध्ये सर्वात अगोदर सुवर्णा भोसले आणि सोनाली भोसले एकाचवेळी 2008 मध्ये पोलीस खात्यात निवड झाली होती. त्यानंतर या दोघींची प्रेरणा घेत इतर चौघीही थोड्याफार अंतराने पोलीस सेवेत दाखल झाल्यात. अर्थात यासाठी त्यांना अनेक अडथळे देखील पार करावे लागले..

आजींना नातींचा अभिमान

भोसले कुटुंबीयांनी कधीही मुलगा आणि मुलगी मध्ये दुजाभाव केला नाही. या उलट या सहाही जणींना त्यांचे आजोबा रंगराव भोसले यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. या मुली आपल्या पायावर उभ्या राहिल्या हे त्यांचे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केल्याचं चंद्रकांत भोसले सांगतात. आजोबांचं स्वप्न या मुलींनी पूर्ण तर केलंच शिवाय परिसरातील इतर मुली आणि आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही एक प्रेरणा दिलीय. सहा नाती पोलीस दलात भरती झाल्या आणि त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या याचं त्यांच्या आजी शालाबाई भोसले आणि इतर कुटुंबीयांना विशेष अभिमान आहे.

राज्यात विविध ठिकाणी पोस्टींग

या सहा पोलीस भगिनी पैकी सारिका भोसले यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोस्टिंग आहे. सुवर्णा भोसले कोल्हापुरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात, सुजाता भोसले अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रुपाली भोसले नाशिक शहर पोलीस, सोनाली भोसले राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर आणि विमल भोसले यांची कोल्हापूर वाहतूक शाखा येथे पोस्टिंग आहे….आपल्या सेवेच व्रत त्या प्रामाणिकपणे निभावत आहेत… भोसले कुटुंबातील या मुलींच यश नक्कीच प्रेरणादायी आहे… पण कुटुंबातील इतर सदस्यांनी या मुलींना दिलेली प्रेरणा अधिक प्रेरणादायी आहे.

पंचक्रोशीतील गावात नावलौकिक

भोसले कुटुंबातील सहा मुली पोलीस दलात भरती झाल्या याचं त्यांच्या वाघवे गावासह पंचक्रोशीमध्ये विशेष कौतूक आहे. वाघवे या गावी ज्यावेळी येतो तेव्हा गावकऱ्यांच विशेष प्रेम मिळतं, असं सुजाता भोसलेंनी सांगितलं.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी खास ट्विट करत भोसले कुटुंबातील सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या सहा रणरागिणींचं अभिनंदन केले आहे. राज्याचं गृहनिर्माण मंत्री अनिल देशमुख यांनी देखली भोसले कुटुंबातील रणरागिणींचे कौतूक केलेय.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कौतूक

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडूनही अभिनंदन

सतेज पाटील यांनी करवीर संस्थापिका छ. ताराराणी महाराणींच्या कोल्हापुरातील वाघवे (ता. पन्हाळा) येथील भोसले परिवाराने त्यांच्या ६ रणरागिनींनी पोलीस सेवेमध्ये भरती होऊन समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे, असं म्हटलंय. भोसले कुटुंबीयांचे व सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या सहा रणरागिणींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे सतेज पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या:

Women’s Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!

लोकचळवळ : सावित्रीबाईंच्या जयंतीला उत्सवाचं रुप देणारी चळवळ, काय आहे इतिहास?

( Kolhapur Bhosale family six daughters working in Maharashtra Police Department Home Minister Anil Deshmukh and Satej Patil appreciate them)

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.