आरोपीला का सोडले? लाडक्या बहिणीचा झाला संताप, पोलिसांना विचारला जाब, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Pimpari Chinchwad Crime News : सध्या कारवाई करण्यात उशीर होत असल्याने राज्यात पोलिसांविरोधात रोष आहे. बदलापूर प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांना पोलिसांनी 12 तास ताटकाळत ठेवले होते. आता एका प्रकरणात पुण्यामध्ये महिलेचे रौद्र रुप दिसले.

आरोपीला का सोडले? लाडक्या बहिणीचा झाला संताप, पोलिसांना विचारला जाब, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
लाडकी बहीण संतापली
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 10:04 AM

काही गंभीर प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईने संताप व्यक्त होत आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईने मोठा जनक्षोभ उसळला. रेल्वे सेवा आणि वाहतूक कित्येक तास बंद होती. आता एका प्रकरणात पुण्यामध्ये महिलेचे रौद्र रुप दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिसांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला का? सोडलं याचा जाब विचारताना दिसत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? का झाला या लाडक्या बहिणीचा संताप अनावर?

काय आहे प्रकरण

तक्रारदार विशाल सातव हा या महिलेचा भाऊ आहे. त्याला तीन ते चार व्यक्तींनी लाथा बुक्क्यासह प्लास्टिकच्या कॅरेटने त्याला मारहाण केली होती. हा सर्व प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला होता या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी तीन ते चार व्यक्तींवर गुन्हा देखील दाखल केला. मात्र, त्या व्यक्तींना सोडून का? दिल याचा जाब विचारत या महिलेने पोलिसांना धारेवर धरलं होतं.

हे सुद्धा वाचा

सहकारी कामगारांसोबत वाद

विशाल सातव स्विगी इन्स्टा मार्ट इथे मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच आणि इतर कामगारांचे काही पटत नव्हतं. यातून त्यांच्यात वाद होऊन मारहाण झाली होती. जितेंद्र ओझरकर, योगेश पडळघरे यांचा सह इतर एक ते दोन जणांनी विशालला मारहाण केली होती.

पोलिसांनी तात्काळ केला होता गुन्हा दाखल

हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणात त्याच दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे. विशालच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार आरोपीला अटक करा असा आग्रह तिचा होता. या गुन्ह्यात अटक करता येत नाही. असं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपींना समज देऊन सोडण्यात आलं होतं. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तक्रारदाराची बहीण ही पोलिसांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला का सोडलं याचा जाब विचारताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपींना तुरुंगातच डांबून ठेवायला हवं होते, असा या महिलेचा आग्रह होता. नियमानुसार कारवाई केल्याचा माहिती पोलिसांनी दिली.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.