अभिजित पोते, पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. यामुळे विरोधकांकडून सरकारला सातत्याने लक्ष केले जात आहे. या प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीचा अहवालवरुन अद्यापही कारवाई केली नाही. हाच मुद्दा उचलत आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहे. २७ ऑक्टोंबर रोजी ससून रुग्णालयासंदर्भातील अहवाल दिला गेला. त्यानंतर तो अजून प्रसिद्ध करत नाही. या प्रकरणात डीनला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला.
राज्य सरकार अधिष्ठाता संजीव ठाकूर याला पाठिशी घालत आहे. ललित पाटील प्रकरणात त्यांचा सहभाग स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ललित पाटील यांच्याकडून पैसे घेऊन संजीव ठाकूर यांनी त्याला नऊ महिने पंचातारांकीत सुविधा दिल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल आहे. त्यानंतर अजूनपर्यंत एकाही पोलिसांवर कारवाई नाही. अनेक लोकांनी यामध्ये पैसे घेतले आहे. सोने घेतले आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही काहीच कारवाई नाही. ललित पाटील प्रकरण थंड करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे.
सरकारकडून या प्रकरणात कारवाई झाली नाही तर आपण उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला. ललित पाटील फरार झाल्या प्रकरणी तपासाला गती मिळाली नाही. मी या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तपास सुरू आहे तो होऊ द्या, असे त्यांनी म्हटले आहे. जे पोलीस आणि ससून रुग्णालयाचे आधिकारी दोषी त्यांना अटक करा आणि समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, अशी मागणी त्यांनी केली.
ससूनच्या कॅन्टीनमधून हे ड्रग्स विकले जात होते. यात जे दोषी आहेत त्यांना अटक करा. अन्यथा आपण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहे. हा सगळा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा. राज्य सरकारयावर काम करणार नाही, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.