बारामती-फलटण-लोणंद व पुणे-मिरज रेल्वेमार्गासाठी 100 एकरपेक्षा अधिक जमिनीचे थेट खरेदीतून भूसंपादन – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बऱ्हाणपूर, नेतपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कऱ्हावागज, सावंतवाडी व तांदुळवाडी या 12 गावांमधील खासगी जमिनीचे भूसंपादन होणार आहे. या जमिनेचे संपादन करत असताना जमिनीचे दर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दर निश्चिती समितीने निश्चित करण्यात आले आहेत
पुणे- गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या बारामती-फलटण-लोणंद आणि पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे काम आता मार्गी लागणार आहे. यासाठी एका महिन्याच्या कालावधीत 100 एकरपेक्षा अधिक क्षेत्राचे थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ( Collector Dr. Rajesh Deshmukh)यांनी दिली आहे. या भूसंपादनामुळे या लोहमार्गाच्या कामाला येणार गती मिळणार आहे. बारामती-फलटण-लोणंद नवीन एकेरी रेल्वे मार्गाची एकूण 63.65 किमी लांबी असून त्यापैकी 37.20 किमी रेल्वेमार्ग (Railroad)बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील 12 गावांमधील खासगी जमिनीचे भूसंपादन (Land acquisition)केले जाणार आहे. या सर्व गावातील जमिनीचे दर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ‘दर निश्चिती समिती’ने निश्चित केले आहेत या 12 गावांव्यतिरिक्त आणि कटफळमधील एमआयडीसीची जमीन प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात येणार प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या 184 हेक्टर जमिनीपैकी 70 हेक्टर जमीन थेट खरेदीने संपादित केली जाणार आहे.
या गावातील जमिनीचे होणार हस्तांतरण
या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बऱ्हाणपूर, नेतपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कऱ्हावागज, सावंतवाडी व तांदुळवाडी या 12 गावांमधील खासगी जमिनीचे भूसंपादन होणार आहे. या जमिनेचे संपादन करत असताना जमिनीचे दर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दर निश्चिती समितीने निश्चित करण्यात आले आहेत.जमीन खरेदीसाठी प्राप्त 115 कोटी रुपये निधीपैकी १०० कोटी रुपये खर्च झाले असून पुढील खरेदी प्रक्रियेसाठी निधी मागणी प्रस्ताव दाखल केला आहे. सर्व खासगी जमिनीची खरेदी प्रक्रिया जून 2022 अखेर पूर्ण करण्याचे प्रशासनाने प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.
मिरज रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रकिया
मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादन करावयाच्या खासगी जमिनीपैकी 87 टक्के जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक 4 हेक्टर 55 आर वनजमिन हस्तांतरणासाठी केंद्र शासनाच्या वनविभागाला दाखल केलेल्या प्रस्तावाला परवानगी प्राप्त झाली आहे. प्रकल्पासाठी 93 आर खासगी जमीन खरेदी करण्यात आली असून 43 आर शासकीय जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. उर्वरित खासगी जमीनीची खरेदी सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.