Mumbai pune express way work : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ सुरू आहे लेन जोडण्याचं काम, मात्र प्रवाशांना वाटतेय चिंता…

महामार्ग पूर्ण झाल्यावर आठ पदरी होणार आहे. बांधकाम सुरू असताना, आम्ही अनेक ब्लिंकर आणि चिन्हे लावली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना बांधकाम कामाबद्दल सतर्क केले जाते. त्यांनी सावध राहून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai pune express way work : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ सुरू आहे लेन जोडण्याचं काम, मात्र प्रवाशांना वाटतेय चिंता...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 7:30 AM

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai pune express way) दोन्ही बाजूंना लोणावळ्याजवळ 1000 मीटर लांबीच्या मार्गावर लेन जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेले बांधकाम हा महामार्गावरील राज्य सरकारच्या ‘मिसिंग लिंक प्रोजेक्ट’चा भाग आहे. परंतु हे बांधकाम अनेक प्रवाशांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. रस्त्यावरील अनेक पॅचेस फुटले आहेत आणि काँक्रीटचे ब्लॉक्स आणि बांधकाम साहित्य बाजूला टाकण्यात आले आहे. तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक्स्प्रेसवे वापरणाऱ्यांना कामाचा इशारा देण्यासाठी आणि सावधगिरीने वाहन चालवण्याचा इशारा प्रत्येक ठिकाणी देण्यात आला आहे. बॅरिकेड्स (Barricades) लावण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर अनेकांनी सांगितले, की हायस्पीड कॉरिडॉरमध्ये काम धोक्याचे आहे. कारण अपघात टाळण्यासाठी ड्रायव्हर्स वेळेत चिन्हे किंवा मशिनरी पाहू शकत नाहीत.

‘सावध राहून काळजीपूर्वक वाहन चालवावे’

काहींनी सांगितले, की एक्स्प्रेसवेवरील रात्रीचा प्रवास नेहमीच धोक्याचा असतो. अशा प्रकारचे काम त्याला अधिक धोकादायक बनवते, विशेषत: जेव्हा लेनमधून वेगवान ट्रक प्रवास करत असतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक लेन तयार केली जात आहे, जी खोपोलीतून बाहेर पडल्यानंतर बोगद्याकडे नेईल. अतिरिक्त लेन सुमारे 1,000 मीटरपर्यंत पसरलेली आहे आणि ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर आठ पदरी होणार आहे. बांधकाम सुरू असताना, आम्ही अनेक ब्लिंकर आणि चिन्हे लावली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना बांधकाम कामाबद्दल सतर्क केले जाते. त्यांनी सावध राहून काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मे अखेर कामे पूर्ण होण्याची अपेक्षा

मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये बायपास बांधणे समाविष्ट आहे, जे घाट विभाग वगळून एक्स्प्रेस वेची एकूण लांबी 6 किमी आणि पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 25 मिनिटांनी कमी करेल. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की एक्स्प्रेस वेवर मान्सूनपूर्व काम एकाच वेळी हाती घेण्यात येत आहे. पावसाळ्यासाठी तयार राहण्याची गरज आहे आणि ड्रेनेज सिस्टमची साफसफाई करणे, घाट विभागातील मोकळे खड्डे ओळखणे यासह इतर कामे सुरू आहेत. तसेच, चिन्हे आणि लेन खुणा ज्या मिटल्या आहेत किंवा चिन्हांकित केल्या आहेत आणि बदलल्या आहेत हे स्पष्ट नाही. आम्ही सर्व ब्लिंकर्स तपासत आहोत आणि आवश्यक तेथे बदलत आहोत. बोगद्यांमधली प्रकाशयोजना आदी कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.