शिर्डी : रविवारची सुट्टी असल्यानं शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मंदिर परिसरात तब्बल 2 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. नवीन वर्षात आजची गर्दी उच्चांकी आणि विक्रमी म्हणावी लागेल. साई भक्तांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने ऑफलाईन दर्शन पास व्यवस्था सुरु ठेवलीय. पेड दर्शन पास आणि ऑनलाईन पासधारकांची रांगही 1 किलोमीटरपर्यंत लागली आहे. ऑनलाईन पास घेऊन न आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यानं भाविक संताप व्यक्त करत असल्याचा प्रकारही पाहायला मिळत आहे.(Large crowd to visit Sai Baba in Shirdi due to Sunday holiday)
गुरुवार, शनिवार आणि रविवार अशा 3 दिवसात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साई संस्थाननं ऑफलाईन दर्शन पास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यामुळे मोठा गोंधळ उडत असल्यानं संस्थानला ऑफलाईन दर्शन पास सुरु ठेवण्याची वेळ आली. दर्शन व्यवस्था सुरळीत असल्याचं आणि ऑफलाईन पास सुरु ठेवणार असल्याचं संस्थानचे मुख्य कार्याकारी अध्यक्ष कान्हुराज बगाटे यांनी सांगितलं.
साई भक्तांनी ऑनलाईन पास काढावे, असं आवाहन साई संस्थानकडून वारंवार करण्यात आलं आहे. मात्र, ऑनलाईन पास वितरण प्रणालीत अनेकदा बिघाड होत असल्यानं भाविक ऑफलाईन पास काढण्यासाठी गर्दी करत आहेत. कोरोना संकटामुळे दिवसभरात 15 ते 20 हजार भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था असल्यानं हजारो भाविकांची गैरसोय होत आहे. रविवारच्या सुट्टीमुळे एक लाखांपेक्षा अधिक भाविक शिर्डीत दर्शनासाठी दाखल झाल्यानं साई संस्थानच्या यंत्रणेवर अधिक ताण येत आहे.
संबंधित बातम्या :
अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान
Large crowd to visit Sai Baba in Shirdi due to Sunday holiday