Aundh: पुण्यात आता बाल वयातच मिळणार वाहतूक नियमावलीचे धडे ; महापालिकेने उभारले ‘वाहतूक पाठशाला उद्यान’

उद्यानातील मार्गातच सिग्नल यंत्रणा , रस्त्यांवरचे चौक, पार्किंगची व्यवस्थायासगळ्याचे प्रात्यक्षिके उद्यानात पाहायला मिळतात. या सगळ्यामुळे लहानमुलांना हसतखेळत वाहतूक नियमावलीची माहिती मिळण्यास मदत होते. या उद्यानात फिरण्यासाठी तिकीट दाराची आकारणी केली जाते.

Aundh: पुण्यात आता बाल वयातच मिळणार वाहतूक नियमावलीचे धडे ; महापालिकेने उभारले 'वाहतूक पाठशाला उद्यान'
Vahatuk Pathshala Udyan Image Credit source: google
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 5:41 PM

पुणे – वाहन चालवायला सर्वांच आवडते, मात्र वाहतुकीचे नियम पाळायचे म्हटले, की अनेकदा नाक मुरडले जाते. मात्र लहानपानापासूनच मुलांमध्ये वाहतूक नियमाची शिस्त लागावी या उद्देशाने पुण्यात चक्क ‘वाहतूक पाठशाला उद्यान ‘ (Transportation School Park )उभारण्यात आले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लहान मुलांना वाहतुकीचे धडे दिले जात आहेत. शहरातील औंध परिसरात (Aundh area)ही शाळा उभारण्यात आली आहे. त्यामुळं लहान मुलांना खेळण्यातून वाहतूक नियमावली(Traffic Rule)  समजण्यास मदत होणार आहे. पुण्यात दुचाकी वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे अपघाताच्या घटना घडतात.यासगळ्याला वाचक बसावा तसेच भविष्यातील तरुण पिढीने वाहतूक नियमाचे पालन करावे यासाठी पुणे महानगर पालिकेच्या वतीने हा वाहतूक उद्यानाचा प्रयोग रावबण्यात आला आहे.

कसं आहे  उद्यान

औंध येथील ब्रेमन चौकातील सिंधू सोसायटी येथे सुमारे एकरभर जागेत हे उद्यान उभारलं आहे. या उद्यानात 12वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जातो . उद्यानात वाहतुकीचे फलक लावण्यात आले आहेत. उद्यानातील मार्गातच सिग्नल यंत्रणा , रस्त्यांवरचे चौक, पार्किंगची व्यवस्थायासगळ्याचे प्रात्यक्षिके उद्यानात पाहायला मिळतात. या सगळ्यामुळे लहानमुलांना हसतखेळत वाहतूक नियमावलीची माहिती मिळण्यास मदत होते. या उद्यानात फिरण्यासाठी तिकीट दाराची आकारणी केली जाते. यामध्ये महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना 5  रुपये तिकीटाची आकारणी केली जाते. शनिवार रविवार हे उद्यान बंद असते तर इतरवेळी उद्यान पार्कची वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत खुले असते. साधारण 18  वर्षे झाल्या नंतर मुलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. मात्र अनेकदा वाहतूक नियमांच्या बाबतीत सजग नसलेले पाहायला मिळते. त्यामुळे बालवयातच वाहतुकीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने याची उभारणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.