Pune rain : पुण्यात 20 ऑगस्टपर्यंत हलका तर विदर्भात 18 ते 21 ऑगस्टदरम्यान हलका ते मध्यम पाऊस, वेधशाळेचा अंदाज

उत्तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली, 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Pune rain : पुण्यात 20 ऑगस्टपर्यंत हलका तर विदर्भात 18 ते 21 ऑगस्टदरम्यान हलका ते मध्यम पाऊस, वेधशाळेचा अंदाज
पुण्यातील पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 11:11 AM

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात 20 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. शहरातील काही भागात बुधवारी हलका पाऊस झाला. शिवाजीनगरमध्ये 0.6 मिमी आणि चिंचवडमध्ये 0.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर लोहगाव, पाषाण, लवळे आणि मगरपट्टा यासर्व ठिकाणी शून्य पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली आहे.18 ऑगस्ट रोजी पुण्याच्या आसपासच्या घाट क्षेत्रांसाठी येलो अलर्टसह मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा देण्यात आला आहे. तर पुणे शहरात 20 ऑगस्टपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) म्हणाले, की 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट रोजी शहर किंवा घाट क्षेत्रांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

ढगाळ वातावरणासह पाऊस

घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे, असे कश्यपी म्हणाले. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुणे शहरात 20 ऑगस्टपर्यंत ढगाळ वातावरणासह पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील चार उपविभागांपैकी विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

एक चक्रवाती परिवलन दक्षिण म्यानमार आणि शेजारच्या परिसरात आहे आणि मध्य-ट्रोपोस्फेरिक पातळीपर्यंत विस्तारित आहे. त्याच्या प्रभावाखाली 19 ऑगस्टच्या आसपास उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या उष्णतेचे पश्चिमेकडील टोक त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे आहे. 20 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत ते असेच राहण्याची आणि हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तरेकडे ते सरकणार, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

धरणांतून पाण्याचा विसर्ग

उत्तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली, 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आलेला आहे. दोन दिवसांतील पावसामुळे वडिवळे धरण प्रशासनाने 550 क्युसेस ने पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीत सुरू केला आहे. तर भोरमधील भाटघर आणि नीरा देवघर धरणे 100 टक्के भरल्याने, दोन्हीही धरणांमधून जवळपास 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात आला आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.