Pune Ganeshotsav : गणेश स्थापना अन् विसर्जनाच्या दिवशी दारू दुकानं राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय?

मद्यनिषेध अधिनियम 1949मधील नियम 142अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक काढले आहे.

Pune Ganeshotsav : गणेश स्थापना अन् विसर्जनाच्या दिवशी दारू दुकानं राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय?
पुणे गणेश मिरवणूक, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 3:20 PM

पुणे : गणेश स्थापना (Ganesh chaturthi) आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार (Liquor shops will remain closed) आहेत. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही ज्या भागात गणेश विसर्जन असणार त्याभागातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी हे आदेश दिले आहेत. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी देशमुख यांनी हा आदेश जारी केला आहे. यासाठी अशा दुकानांवर वॉचही ठेवला जाणार आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अचानक तपासणी केली जाणार

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यानुसार, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मद्यविक्री करणारी दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित व्हावे. उत्सव काळातील इतर दिवशी दिलेल्या वेळेनंतरदेखील दुकानदार दारू विक्री चालु ठेवतात. अशा बेकायदा कामास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक तपासणी केली जाणार आहे.

आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार

मद्यनिषेध अधिनियम 1949मधील नियम 142अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक काढले आहे.

हे सुद्धा वाचा

बंदचा कालावधी आणि बंदचे क्षेत्र

  1. 31 ऑगस्ट – पूर्ण पुणे जिल्हा
  2. 09 सप्टेंबर – पूर्ण पुणे जिल्हा
  3. 10 सप्टेंबर – पुणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर् मद्य विक्री अनुज्ञती, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंतच्या कालावधीकरिता
  4. गणेशोत्सवाचा 5वा आणि 7वा दिवस (संपूर्ण दिवस) – ज्या भागांत पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागात नियम लागू

…अन्यथा कडक कारवाई केली जाणार

यासोबतच ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असतील, त्या ठिकाणच्या मार्गावरील सर्व भागातील मद्यविक्री विसर्जनाच्या दिवशी बंद करण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.