विधानसभा, लोकसभेत आघाडी किती जागांवर जिंकणार?; कसब्याचा निकाल येताच संजय राऊत यांनी आकडाच सांगितला

सत्तेचं दर्शन प्रदर्शन, विकृती हे सर्व होऊनही कसब्यातील किंवा पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिलीय. त्यापासून त्यांनी धडा घेतला पाहिजे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण पुणेकर त्या अमिषाला बळी पडले नाहीत.

विधानसभा, लोकसभेत आघाडी किती जागांवर जिंकणार?; कसब्याचा निकाल येताच संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 11:28 AM

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सर्व निवडणुका एकजुटीने लढण्याचं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील जनतेचा मूड पाहता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 200 आणि लोकसभेत 40 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असं म्हणत राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटालाही डिवचलं आहे.

कसबा काय किंवा चिंचवड काय… दोन्ही निवडणुकांनी धडे दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एखादा बंडखोर.. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला हा धडा आहे. कसब्याचा हा निकाल हा राज्याच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024पर्यंत महाविकास आघाडीने मजबूतीनं एकत्र काम केलं, एकजूट दाखवली तर विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्ष अधिक जागा निवडून येतील. लोकसभेला 40 पेक्षा अधिक जागा जिंकू. हे मी खात्रीने सांगतो, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पुणेकर अभिनंदनास पात्र

सत्तेचं दर्शन प्रदर्शन, विकृती हे सर्व होऊनही कसब्यातील किंवा पुण्यातील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना चपराक दिलीय. त्यापासून त्यांनी धडा घेतला पाहिजे. पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण पुणेकर त्या अमिषाला बळी पडले नाहीत. त्याबद्दल पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. कसब्यात घराघरात पैशाचे पाकिटे फेकली आहेत. धंगेकर यांचं हे काम नाही. तो साधा कार्यकर्ता आहे.

तरीही लोकांनी धनशक्ती लाथाडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं कॅबिनेट एका कसब्यात रोज मंत्रिमंडळाच्या बैठका घेत होतं. जनतेने तेही नाकारलं. ही सुरुवात आहे. कसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी आहे, ही घोषणा सध्या सुरू आहे. त्याची ही सुरुवात आहे, असं राऊत म्हणाले.

नानांच्या मताशी सहमत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय हा स्थानिक पातळीवर घेतला जातो. नाना पटोले यांच्या मताशी मी सहमत आहोत. पण तरीही आम्ही एकत्र बसून चर्चा करू. ग्रामपंचायत, जिल्हापरिषदा, नगरपरिषद आणि इतर निवडणुकांबाबत स्थानिक नेतेच अधिक निर्णय घेत असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.