Mahadev Jankar : रासपची शिवसेना होण्याच्या मार्गावर, महादेव जानकरांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी, कार्यकर्ते म्हणतात पक्ष आमचाच

धनगर आंदोलनामुळे फोकस मध्ये आलेले नेते महादेव जानकर हे रासोपाच्या कार्यकर्त्यांना नीट वागणूक देत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळेच कार्यकर्ते बंडाच्या तयारीत आहेत.

Mahadev Jankar : रासपची शिवसेना होण्याच्या मार्गावर, महादेव जानकरांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी, कार्यकर्ते म्हणतात पक्ष आमचाच
रासपची शिवसेना होण्याच्या मार्गावर, महादेव जानकरांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी, कार्यकर्ते म्हणतात पक्ष आमचाचImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:15 PM

बारामती : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बंड आपण सर्वांनी पाहिलं, या बंडानं शिवसेनेत उभी फूट (Shivsena) निर्माण केली. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट तयार झाला. आधी 40 आमदार, सोबत दहा पक्ष आमदार आणि आता नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची लागलेली रिघ ही सबंध महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र अशीच अवस्था आता महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची होण्याच्या मार्गावर आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण महादेव जानकर यांच्या कार्यपद्धतीवर रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तीच नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. धनगर आंदोलनामुळे फोकस मध्ये आलेले नेते महादेव जानकर हे रासोपाच्या कार्यकर्त्यांना नीट वागणूक देत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळेच कार्यकर्ते बंडाच्या तयारीत आहेत.

रासपमध्यही उभी फूट पडणार?

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातही उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महादेव जानकर यांच्या कार्यपद्धतीला त्यांचेच कार्यकर्ते वैतागले आहेत. या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक आज बारामतीमध्ये पार पडली आहे. या बैठकीत महादेव जानकर यांची साथ सोडून यशवंत सेनेद्वारे कार्यरत राहण्याचा निर्णय काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जानकर यांच्याकडून कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष हा आमचाच

तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हा महादेव जानकरांचा नसून आमचाच आहे. असा पवित्रा आता या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. राष्ट्रीय समाज पक्षासाठी आम्ही कायदेशीर लढा लढू, असे या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. जसे एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही म्हणजे शिवसेना तसेच आता हे कार्यकर्तेही म्हणू लागलेत की आम्ही म्हणजेच रासप…त्यामुळे आता महादेव जानकर यावर काय भूमिका घेतात. यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे.

अनेक नेत्यांनी रासपची साथ सोडली

सध्याचे भाजपकडून स्वतः चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर हेही महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुशीत तयार झाले आहेत. मात्र त्यानंतरही त्यांनी नाराजी व्यक्त करत रासपाची साथ सोडली आणि व्हाया वंचिता आघाडी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हाही रासपातले मतभेद चव्हाट्यावर आले होते. महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांच्या जवळचे नेते म्हणून पाहिले जातात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर मात्र त्यांना संधी मिळाली नाही.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.