Pune Crime : इंद्रायणी नदीपात्रात अवैध वाळूउपसा; मुद्देमाल जप्त मात्र आरोपी पसार
इंद्रायणी (Indrayani) नदीपात्रात अवैध वाळू उपसा (Illegal sand dredgers) करणाऱ्यांना लगाम घालत पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. याप्रकरणी खेड महसूल पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई केली.
पुणे : इंद्रायणी (Indrayani) नदीपात्रात अवैध वाळू उपसा (Illegal sand dredgers) करणाऱ्यांना लगाम घालत पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. याप्रकरणी खेड महसूल पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई केली. यामध्ये एक पोकलेन, एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर असा तब्बल 94 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खेड तालुक्यातील खालुंब्रे व येलवाडी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईच्या दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर याप्रकरणी महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अशा अवैध काम करणाऱ्यांना यानिमित्ताने इशाराच दिला आहे. कोणीही अवैध कामे करू नयेत, यापुढे अशी कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तलाठ्यास मिळाली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुम्ब्रे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तलाठी फिर्यादी विष्णू रूपनवर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अवैधरित्या वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापा टाकला आणि ही कारवाई केली.
चाकण पोलिसांकडून तपास
तलाठी आणि त्यांच्या पथकाने कारवाई केल्याची चाहूल लागताच आरोपी पळून गेले आहेत. यात 45 लाखांचे एक पोकलेन, 22 लाखांची एक जेसीबी आणि 24 लाखांचे तीन ट्रॅक्टर असा एकूण 91 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.