“मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”, सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला!

भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. अशातच यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला!
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 6:47 PM

पुणे : पुण्यातील पोट निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवर रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत यशस्वी झालेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. ही आणखी एक आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. धंगेकर कुटुंब हे मूळचे नाथाची वाडी, ता. दौंड येथील असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी धंगेकर यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तसेच आणि नेत्यांनी केलेल्या संघटीत प्रयत्नांचा विजय आहे. यासाठी दिवसरात्र एक करुन प्रचार केलेल्या सर्वांचे मनापासून आभार. मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

या निवडणुकीच्या निकालावर भाजपचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, 28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 इतकी मते मिळाली असून त्यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.