कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. (Maharashtra Child Corona Center)

कोरोनाचा लहान मुलांना विळखा, पुण्यासह ठाणे, नागपुरात चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार
small child corona
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 9:44 AM

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे. या निर्देशानंतर अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. (Child Corona Center setup in Maharashtra)

पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका अलर्ट मोडवर आहे. पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात हे चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारले जाईल. या ठिकाणी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे.

या हॉस्पिटलसाठी चार कोटी रुपयांचा खर्च येणार असून येत्या दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.

औरंगाबादेत लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालय

पुण्याप्रमाणेच औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. औरंगाबादेतील एमजीएम परिसरात 100 खाटांचे कोविड बाल रुग्णालय उभं राहणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची तयारी सुरू केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ही तयारी केली जात आहे. लहान मुलांसोबतच गरोदर मातांसाठीही 50 खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसात हे रुग्णालय उभे केले जाईल, असे बोलले जात आहे.

नागपुरात लहान मुलांसाठी अद्ययावत कोविड सेंटर

तसेच नागपुरात लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी नागपूर प्रशासन कामाला लागलं आहे. नागपुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी विभागीय टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी एम्समध्ये 200 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभे केले जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने ही तयारी केली आहे. यानुसार लहान बालकांसाठी व्हेंटीलेटर, एनआयसीयू, उपचारासाठी खासगी डॉक्टरसह परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच मुलांसाठी लवकरंच फिवर क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. या टास्क फोर्समध्ये डॉ. विनिता जैन, डॉ. उदय बोधनकर, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. दिप्ती जैन एम्सच्या डॉ. मिनाक्षी गिरीश यांचा समावेश आहे.

ठाण्यात 100 चाईल्ड कोरोना बेड 

ठाणे पालिकेच्या हद्दीत रुग्णांची संख्याही कमी होत आहे. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंग प्लाझा मध्ये अलिप्त १०० बेड “चाईल्ड कोरोना” म्हणून आरक्षित करणार आहे, ठाणे पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.

ठाण्यात दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला. यात काही लहान मुलांनाही कोरोनाची  बाधा झाल्याचे समोर आले. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि त्याचा फटका लहान मुलांना बसणार असल्याचे बोललं जात आहे. यामुळे प्रसंगावधान म्हणून ठाणे पालिकेच्या हद्दीत असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात १०० सुसज्ज बेड हे “चाईल्ड कोरोना” म्हणून आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांच्या कोरोना उपचारात मोठी मदत होणार आहे.

तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास पार्किंगमध्ये सरसकट मुलांवर उपचार केल्यास मुलांसाठी ते धोकादायक राहणार आहे. तर मोठी माणसे एकांकी असल्याने घाबरतात तर मुलांवर पार्किंगमध्ये एकांकी ठेवून उपचार करणे धोक्याचे आणि कठीण जाणार आहे. त्यामुळे या 100 बेड रुग्णालयात अलिप्त ठेवल्यास मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबीयांतील एक व्यक्ती सोबत राहण्याची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे मुलांच्या उपचारासाठी तैनात असलेल्या कर्मचारी यांचा ताण कमी होईल आणि मुले लवकर कोरोना मुक्त होतील, असेही त्यांनी सांगितले. (Child Corona Center setup in Maharashtra)

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.