पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, सभेवर पावसाचे सावट, महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर जय्यत तयारीही सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, सभेवर पावसाचे सावट, महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी
Narendra Modi
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 10:17 AM

PM Narendra Modi Pune Visit : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (२६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्धाटन केले जाणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने पुण्यात जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या संध्याकाळी 5.35 च्या दरम्यान पुणे विमानतळावर दाखल होती. त्यानतंर ते साधारण 5.55 च्या सुमारास पुणे विमानतळावरुन मोदी शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनला पोहोचतील. यानंतर ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथून शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच मेट्रोने प्रवास करत मोदी स्वारगेटला पोहोचतील. यानंतर स्वारगेट येथून स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येईल. तसेच स्वारगेटवरुन 6.30 वाजता मोदी एसपी कॉलेज येथे सभास्थळी पोहचतील. यानंतर रात्री 7.55 मिनिटांनी मोदी पुणे विमानतळाहून दिल्लीला रवाना होतील.

सभेवर पावसाचे सावट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने 27 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या मैदानावर जय्यत तयारीही सुरु आहे.

मात्र सध्या पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. चिखल झालेल्या ठिकाणी माती टाकली जात आहे. मात्र पुढील दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सभेच्या ठिकाणी या दृष्टीने तयारी सुरू आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर पावसाचे सावट पाहायला मिळत आहे.

महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे एसपी कॉलेज मैदानाच्या बाहेर नरेंद्र मोदींच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. यात कसबा मतदारसंघातून इच्छुक हेमंत रासणे, धीरज घाटे आणि पर्वतीमधून इच्छुक माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांच्याकडून जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत असून एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्यामुळे आता मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.