Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: मार्केटमधून वीज खरेदी करणार, पण भारनियमन होऊ देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही

राज्यावर भारनियमनाचं संकट ओढवलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे.

Ajit Pawar: मार्केटमधून वीज खरेदी करणार, पण भारनियमन होऊ देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही
Ajit Pawar: मार्केटमधून वीज खरेदी करणार, पण भारनियमन होऊ देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 10:59 AM

पुणे: राज्यावर भारनियमनाचं संकट ओढवलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मोठा दिलासा दिला आहे. राज्यासह देशात कोळश्याचा तुटवडा (coal shortage) आहे. त्यामुळे भारनियमनाचं (load shedding) संकट आहे. पण आम्ही भारनियमन होऊ देणार नाही. मार्केटमधून वीज खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरून वीज खरेदी करू, पण राज्यात भारनियमन होऊ देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. वीज भारनियमन होणार नाही यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला नितीन राऊतही उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती. ब्रीफ केलं. सर्वांनी त्यात लक्ष घातलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उन्हाची तीव्रता वाढल्याने विजेचा शॉर्टेज निर्माण झाला आहे. देशभरात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोळसा मिनिस्ट्रीलाही सांगण्यात आलं. कमी दिवसाचा कोळसा आहे. तो वाढवून द्या. मार्केटमध्ये जिथे वीज आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबाबतची कॅबिनेटने परवानगी दिली आहे. भारनियमन होणार नाही याची खबरदारी घेतली आहे, असं अजित पवार म्हणाले. वीज संकटात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळे मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

नितीन राऊत काय म्हणाले?

कॅबिनेट बैठकीनंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. विजेची समस्या ही अपुरा कोळसा पुरवठा त्याचबरोबर उन्हाळ्यात अचानक वाढलेली मागणी यामुळे निर्माण झाली असून यावर तात्काळ तोडगा काढण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वॉर स्टेशन स्थापन करण्यात आल्या आहेत. वीज तुटवडा असणारे महाराष्ट्र हे एकच राज्य नसून, देशात 27 राज्यांमध्ये अशीच स्थिती आहे. राज्यात अखंडीत वीज उपलब्ध व्हावी यासाठी कोळसा आयात कऱण्यासाठी निविदा काढल्या आहेत. तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, वीज बचत करणारी उपकरणे वापरणे, वीज वापराबाबातचे ऊर्जा परिक्षण, नादुरूस्त उपकेंद्र बंद करणे असे ऊर्जा बचतीच्या उपाय योजना करण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय वीज निर्मितीसाठी कोळश्याचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. वाँशरीजमधून कोळसा आणण्यासाठी रेल्वे उपलब्ध न झाल्यास, रस्तेमार्गे वाहतूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Aurangabad | Raj Thackeray यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचं भाकित

Real Estate: मुंबई शहर आणि उपनगरात बिल्डरांविरोधात सर्वाधिक तक्रारी! खालोखाल ठाणे, पुणेही

Maharashtra News Live Update : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे धुळ्यात आगमन

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.