भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप करुन सरकारची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न : दिलीप वळसे पाटील
खोटे नाटे आरोप करायचे.केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, जो संबंध नाही तो जोडायचा आणि त्यामधून सरकारच्या बद्दल वातावरण बदलायचा किंवा बिघडवायचा प्रयत्न करायचा, असं सुरु असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पुणे : महाराष्ट्राचे (Maharashtra) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पुण्यात आज विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवण्याचे प्रयत्न, पेनड्राईव्ह प्रकरण आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या संदर्भात भाष्य केलं. ही एक नवीन पद्धत काढली आहे.खोटे नाटे आरोप करायचे.केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, जो संबंध नाही तो जोडायचा आणि त्यामधून सरकारच्या बद्दल वातावरण बदलायचा किंवा बिघडवायचा प्रयत्न करायचा, असं सुरु असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले. एका बाजूला कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला छोट्या गोष्टी वरुन मोठे मोर्चे काढून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा अशी पद्धत सुरु आहे. सरकारची प्रतिमा असल्या गोष्टींमुळे बिघडणार नाही.आम्ही अतिशय पारदर्शी पद्धतीने काम करत आहोत.भविष्यातही करत राहणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या स्टिंग ऑपरेशनसंदर्भात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी तो विषय सीआयडी कडे वर्ग केलाय ते तपास करतील, असं म्हटलंय.
किरीट सोमय्यांच्या दौऱ्याला महत्त्व देण्याची गरज नाही
कोणालाही कुठली लढाई लढायची असेल तर कायदेशीर लढली पाहिजे. कुणीही कायदा हातात घेतला तर त्या सबंधात पोलीस नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती करतील. किरीट सोमय्या यांच्यादौऱ्याला एवढं महत्व देण्याचं कारण नाही. कोण कुठं जातंय याचा ट्रॅक नाही ठेवतं. स्थानिक पोलीस कायद्याप्रमाणे काम आणि कारवाई करतील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरणी तपास सुरु
राजकीय नेत्यांचं फोन टॅपिंग प्रकरणी तपास सुरु आहे. हा तपासाचा भाग आहे,त्यावर मी आता बोलू शकत नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. पुण्यात घडत असलेल्या घटना चिंताजनक आहेत. पोलिसाना अलर्ट राहायला सांगितले आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
इतर बातम्या :
‘आमचा घात करायचा आहे का?’ निल सोमय्यांचा संतप्त सवाल, किरीट सोमय्यांचा तासाभरापासून ठिय्या सुरुच
2 रिसॉर्ट, 2 नेते, 200 गाड्या आणि 400 कार्यकर्ते, दापोलीतल्या महानाट्यात नक्की घडतंय काय?