रविंद्र धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीत परदेशी तरूणीने धरला ताल, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल!
रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर मिरवणुकीमध्ये एका परदेशी तरूणीने केलेला डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
पुणे : पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला बालेकिल्ल्यामध्ये धक्का बसला तर पिंपरीमध्ये त्यांनी आपल जागा राखली आहे. कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. रविंद्र धंगेकरांच्या विजयाने भाजपला 28 वर्षे राखलेला गड गमवावा लागला आहे. रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला. अशातच पुण्यातील एका परदेशी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर मिरवणुकीमध्ये एका परदेशी तरूणीने केलेला डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
संबंधित तरूणी नेमकी कोण? तिचं नाव काय? कोणत्या देशातून आली? याबद्दल कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. ढोल-ताशांच्या तालावर तरूणीने मनसोक्त डान्स केला. ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण सर्वांना माहित असेल आणि ऐकलीही असेल. या म्हणीला अनुसरूनच काहीसा प्रकार पुण्यामध्ये घडला.
Kasba By Election Result | रविंद्र धंगेकर यांच्या विजयी रॅलीत परदेशी तरुणीचा जबरी डान्स#PuneElection #KasbaPeth #HemantRasane #RavindraDhangekar #Chichwad #PuneByPolls #ElectionBreaking #MaharashtraPolitics #tv9marathi pic.twitter.com/iGMSyJNJ71
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2023
कसबा पोटनिवडणुक निकाल
28 वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 इतकी मते मिळाली असून त्यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना हा विजय जनतेचा असून मी केलेल्या 30 वर्ष सातत्याने केलेल्या कामाचा विजय असल्याचं रविंद्र धंगेकर म्हणाले.
पिंपरी- चिंचवड पोटनिवडणुक निकाल
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांनी बाजी मारली आहे. अश्विनी जगताप यांचा 36,031 मतांनी मोठा विजय झालाय. त्यांना एकूण 1 लाख 35 हजार 434 मतं मिळाली. महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना 44 हजार 82 मतं मिळाली आहेत.