Maharashtra Lockdown: कोरोनामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम
गेल्याच आठवड्यात पुण्यातील व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला होता. | Maharashtra Lockdown
पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे असताना आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ठाकरे सरकारने लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय लवकर जाहीर केला नाही तर आम्ही दुकानं उघडू, असे पुण्यातील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. (Shopkeeper and traders association stand on Lockdown in Maharashtra)
त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू झाला तर पुण्यातील व्यापारी त्याला पाठिंबा देतील. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन नसेल तर आम्ही बुधवारपासून दुकाने उघडू, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता उद्यापर्यंत पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
गेल्याच आठवड्यात पुण्यातील व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला होता. तेव्हाही कोणत्याही परिस्थितीत दुकानं उघडणार, असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतला होता. तेव्हा पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उद्भवण्याची भीती होती. मात्र, तेव्हादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतले होते.
महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रात अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्यात आला होता. या लॉकडाऊनंतर अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. त्यामुळे आता महाराष्ट्राला कोरोनाच्या भीषण तडाख्यातून वाचवण्यासाठी आता ठाकरे सरकार अमरावती पॅटर्नच्या लॉकडाऊनची तयारी करत असल्याचे समजते.
संबंधित बातम्या:
Maharashtra Lockdown: ‘सरकारला लॉकडाऊन करताना आनंद होत असेल का?’ नाना पाटेकरांचा आर्त सवाल
Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅटर्नचा लॉकडाऊन?
मुंबईत लॉकडाऊन झाला तर काय होणार?; तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे का?
(Shopkeeper and traders association stand on Lockdown in Maharashtra)